'दादा'ला मिळणार मोठी जबाबदारी; BCCIच्या अध्यक्षपदी होणार सौरव गांगुलीची निवड!

'दादा'ला मिळणार मोठी जबाबदारी; BCCIच्या अध्यक्षपदी होणार सौरव गांगुलीची निवड!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIच्या नव्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याची निवड होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIच्या नव्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याची निवड होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या बृजेश पटेल आणि गांगुली हे दोघे आघाडीवर आहेत. पण गांगुलीला अध्यक्ष करावे याबाबत सर्वांची सहमती झाली आहे. अर्थात यासंदर्भात अधिकृत निर्णय झाला नसला तरी बीसीसीआयच्या सर्व सदस्यांच्या अनौपचारिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर अरुण धुमल कोषाध्यक्ष होतील. अरुण धुमल हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत.तर आसामचे देबाजीत सैकिया हे संयुक्त सचिव होण्याची शक्यता आहे. सैकिया यांची निवड झाली तर बीसीसीआयमध्ये ईशान्येकडील व्यक्तीला प्रथमच इतके मोठे पद मिळेल. मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. जर गांगुलीची आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली तर तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल. गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी गांगुली आणि पटेल यांच्या नावाची चर्चा होती. अध्यक्ष कोणाला करावे यासाठी सुरुवातीला मतभेद होते. यात अनुराग ठाकूर आणि एन.श्रीनिवासन असे दोन गट पडले होते. पण नंतर या दोन्ही गटांचे गांगुलीच्या नावावर एकमत झाले.या दोन्ही नावावर गेल्या काही आठवड्यापासून लॉबिंग सुरु होते. यासंदर्भात मुंबईत रविवारी रात्री एन.श्रीनिवासन, अनुराग ठाकूर आणि राजीव शुक्ला यांची सर्व राज्यातील प्रतिनिधींशी बैठक झाली.

अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज (सोमवारी) नामांकन दाखल केले जाणार आहे. पण यासाठी कोणतीही निवडणूक होणार नाही. आयपीएलचे चेअरमन आणि उपाध्यक्षपदासाठी देखील शोध सुरु आहे. पण खरी लढत बीसीसाआयच्या अध्यक्षपदासाठी गांगुली आणि बृजेश यांच्यात असल्याचे समजते.

गांगुलीची अध्यक्षपदी निवड झाली तर कर्नाटचे बृजेश पटेल यांची आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते. बीसीसीआयच्या अपेक्स काऊंसिलमध्ये 9 सदस्य आहेत. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, संयुक्त सचिव, क्रिकेटर्स असोसिएशनचा एक पुरुष प्रतिनिधी, एक महिला प्रतिनिधी, आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचा एक प्रतिनिधी आणि केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी यांचा समावेश असतो.

क्रिकेटर्स असोसिएशनचे पुरुष प्रतिनिधी म्हणून अंशुमान गायकवाड असतील. यासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी कीर्ती आझाद यांचा 471 मतांनी पराभव केला. तर महिला प्रतिनिधी म्हणून माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांची सर्वसहमतीने निवड करण्यात आली आहे.

ICCमध्ये कोण असणार प्रतिनिधी?

अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या बाबत निर्णय झाला असला तरी आयसीसीमध्ये बीसीसीआयचा प्रतिनिधि कोण असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याचा निर्णय पुढील महिन्यात घेतला जाणार आहे.

दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 07:33 AM IST

ताज्या बातम्या