नवी दिल्ली : एकीकडे मोदी सरकार आणि RBI ने मिळून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार चलनात 75 रुपयाचं चलन आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी विशेष 75 रुपयांचं नाणंही लाँच केलं जाईल अशी माहिती मिळाली आहे. अर्थमंत्रालयाकडून गुरुवारी याबाबत माहिती देण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. याचं महत्त्व आणि हा सुवर्णक्षण या कॉइनद्वारे संपूर्ण भारतात पोहोचवण्यात येणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचा सिंह आणि त्याखाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं होतं. याशिवाय देवनागरी लिपीमध्ये भारत हा शब्द दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये इंडिया असं लिहिलं आहे.
Ministry of Finance to launch a special Rs 75 coin to commemorate the inauguration of the new Parliament building on 28th May. pic.twitter.com/NWnj3NFGai
— ANI (@ANI) May 26, 2023
या नाण्यावर रुपयाचे चिन्ह देखील असेल आणि अंकांमध्ये 75 लिहिलेले असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेचे चित्र असेल. वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘संसद संकुल’ तर खालच्या बाजूला इंग्रजीत ‘संसद संकुल’ असे लिहिले जाईल.
75 रुपयांचे हे नाणे 44 मिलिमीटर व्यासाचे गोलाकार आकाराचे असेल. त्याच्या बाजूला 200 सेरेशन्स असतील. 35 ग्रॅम वजनाचे हे नाणं 4 धातूंपासून तयार करण्यात आलं आहे. या नाण्यामध्ये 50% चांदी, 40% तांबे, 5% निकेल आणि 5% जस्त चा वापर करण्यात आला आहे.
नव्या संसद भवनाचा वाद, फडणवीसांनी करून दिली इंदिरा गांधी-राजीव गांधींची आठवण28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. जुन्या संसद भवनाचं म्युझियम करण्यात येईल. तिथे भेट देणाऱ्यांना कामकाज कसं चालतं याची माहिती दिली जाणार आहे.