जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / PHOTOS: तीन रंगाचा वाघ जन्माला आल्याने आश्चर्य; वाघिण आणि बछडे पाहण्यासाठी गर्दी

PHOTOS: तीन रंगाचा वाघ जन्माला आल्याने आश्चर्य; वाघिण आणि बछडे पाहण्यासाठी गर्दी

PHOTOS: तीन रंगाचा वाघ जन्माला आल्याने आश्चर्य; वाघिण आणि बछडे पाहण्यासाठी गर्दी

यातील एक वाघाचे पिल्लू तीन रंगाचे आहे. त्या पिल्लाचा रंग पिवळा, पांढरा आणि काळा आहे. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तीन रंगांचा असा (tricolor tiger was born) मिलाफ असलेला हा वाघ जगातील एकमेव आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 26 जुलै : मध्य प्रदेशात तीन वेगवेगळ्या रंगांच्या वाघांचा जन्म झाला आहे. इंदूर येथील प्राणीसंग्रहालयात रविवारी दुपारी एका वाघिणीने तीन पिल्लांना जन्म दिला. पांढऱ्या रागिणी नावाच्या वाघिणीने तीन पिल्लांना जन्म दिला. महत्त्वाचे म्हणजे तिन्ही पिल्ली पूर्णपणे भिन्न रंगांची आहेत. यातील एक पिल्लू तीन रंगाचे आहे. त्या पिल्लाचा रंग पिवळा, पांढरा आणि काळा आहे. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तीन रंगांचा असा (tricolor tiger was born) मिलाफ असलेला हा वाघ जगातील एकमेव आहे, असा दुसरा वाघ जगात कुठेही नाही. वाघिण आणि तिन्ही पिल्ली पूर्णपणे निरोगी असल्याचे प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वाघिणही तिच्या बाळांना दूध पाजत आहे. इंदूरच्या प्राणीसंग्रहालयात आता एकूण 15 वाघ झाले आहेत.

News18

रागिणी या पांढऱ्या वाघिणीला काळ्या रंगाच्या वाघासोबत प्राणीसंग्रहालयाच्या परिसरात ठेवण्यात आले होते. ओडिशातील नंदन कानन येथून नऊ वर्षांच्या रागिणी आणि सहा वर्षांच्या विक्कीला आणण्यात आले होते. ही वाघीण बराच काळ गर्भवती असल्याचे दिसत होते. त्यामुळेच तिला सुरक्षित प्रसूतीसाठी अनेकवेळा वेगवेगळ्या बंदिस्त ठिकाणी ठेवण्यात आले, पण तिने पिल्लांना जन्म दिला नव्हता. यामुळे प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाला गर्भधारणा झाली नसल्याचे वाटले, त्यामुळे नंतर रागिणीला सामान्य खोलीत ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी रागिणीने अचानक तिने या पिल्लांना जन्म दिला. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षक प्राणीसंग्रहालयात उपस्थित होते. दुपारी प्रेक्षक वाघिणीला पाहत असताना तिने तिन्ही पिल्लांना जन्म दिला. वाघिणीची पिल्ले डोळ्यांसमोर जन्माला आल्याचे पाहून उपस्थित प्रेक्षकांसाठीही सुखद धक्का होता. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर जन्मलेल्या तीन पिल्लांपैकी एक पिल्लू दोन रंगाचे आहे. हे पिल्लू वरून पूर्णपणे काळे आहे, खालून पांढरे आहे तर दुसरे जास्त काळे आहे आणि त्याचा काही भाग पिवळा आहे. याशिवाय एक पिल्लू तीन रंगांचे आहे. त्याचे शरीर पिवळे, पांढरे आणि काळ्या रंगाचे आहे.

News18

जगात कुठेही तीन रंगांचा वाघ नाही, असे सांगितले जात आहे. ही पिल्ली अजून थोडी मोठी झाल्यावर रंग संयोजन अधिक स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: tiger , Tigers
  • First Published :
जाहिरात
जाहिरात