Home /News /news /

पैसे देऊन मनाची शांती शोधतायेत इथले लोक; त्यासाठी जेलमध्ये जाण्याचीही तयारी

पैसे देऊन मनाची शांती शोधतायेत इथले लोक; त्यासाठी जेलमध्ये जाण्याचीही तयारी

फोटो सौजन्य - AFP Relaxnews/ edrockschool/ Istock.com

फोटो सौजन्य - AFP Relaxnews/ edrockschool/ Istock.com

लोक आता इतके वैतागले आहेत की पैसे देऊन मनाची शांती मिळाली (Money for inner Peace) तरी ती घ्यायला तयार झाले आहेत.

सिऊल, 22 डिसेंबर : जगभरात आलेल्या कोरोना (Coronavirus) विषाणू महासाथीने समान्य माणसाच्या जगण्याचे आयामच बदलून टाकले आहेत. तंत्रज्ञानाची प्रगती आणि पैसा यामुळे सगळे हा काळ सुरू होण्याआधी पैशांच्या मागे धावत होते पण या महासाथीनंतर (Covid-19) आरोग्य महत्त्वाचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे आता लोक मनशांती (Peace) शोधत आहेत. जगभरात अशीच परिस्थिती आहे. दैनंदिन जगणं इतकं विचित्र झालं आहे की त्यातल्या तणावामुळे माणसं आत्महत्याही करत आहेत. याच तणावापासून दूर जाण्याचे विविध मार्ग सध्या जगभरातील (World) माणसं शोधत आहेत. दक्षिण कोरिया या देशातले लोक इतके वैतागले आहेत की ते पैसे देऊन मनाची शांती मिळाली (Money for mental inner Peace) तर ती घ्यायला तयार झाले आहेत. अगदी जेलमध्ये जाण्याचीही त्यांची तयारी आहे (People paying for peace). दक्षिण कोरियात (South Korea) करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाबद्दल विस्ताराने माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यांच्या रोजच्या रुटिनला लोक कंटाळले आहेत आणि त्यांना शांतता हवी आहे. काही ठिकाणी तर असं दिसून आलं आहे की एखाद्या शांत ठिकाणी जाण्यासाठी पैसे द्यावे लागले तरीही लोक तिथं जायला तयार आहेत. हे पैसे देण्यासाठी ते त्यांचा मोबाईल फोन विकायला तयार आहेत. त्याहून अधिक म्हणजे आपलं घरसंसरा सोडून शांततेच्या शोधातही अनेक जण जायला तयार आहेत, लाइव्ह हिंदुस्थानने इनसायडरच्या ऑनलाइन रिपोर्टचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. हे वाचा - आता Anxiety ला बनवा तुमची Superpower; तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितला सॉलिड फंडा याचबरोबर दैनिक भास्करनेही एका केस स्टडी करून त्याबद्दल वृत्त दिलं होतं. त्यामध्ये असं म्हटलं होतं की लोकांनी इतका उबग आला आहे की परस्परांना भेटायची इच्छाही (meetings) या लोकांना राहिलेली नाही. त्यात म्हटलं आहे की दक्षिण कोरियातील नागरिक कामाच्या सततच्या ताणामुळे त्रस्त झाली आहे. एक 39 वर्षांची महिला हान ये जंग म्हणाली, "दिवसभर कामाची दीर्घ शिफ्ट केल्यानंतर मी शांततेच्या शोधात असते. जगण्यातला तणाव (Stress) प्रचंड वाढला आहे. काही दिवसांपूर्वी मी चालत चालेल होते माझा एका व्यक्तीला धक्का लागला. एरव्ही आम्ही एकमेकांची माफी मागून पुढे गेलो असतो पण आताच्या परिस्थितीत भांडणंच होतात. जो उठेल तो भांडायलाच लागतो" एवढंच नाही या रिपोर्टमध्ये असंही सांगितलंय की सर्व्हेनुसार दक्षिण कोरियातील 73 टक्के जनता तणावग्रस्त आहे. मेट्रो डॉट कॉमनी म्हटलं आहे की ताण, चिंता आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी लोक कुटुंबाला सोडून एकटेच शांत जागा शोधताहेत. हे लोक पर्वतांत, सुमद्र किनारी किंवा नदीकिनारी बसून निसर्ग न्याहाळत तासनतास घालवतात. हे वाचा - दररोज इतका वेळ सूर्यप्रकाश अंगावर घेणं आहे खूप फायदेशीर; अनेक आजार राहतात दूर दुसऱ्या एका अभ्यासात म्हटलं आहे की दक्षिण कोरियाच्या गंगवॉन प्रांतात हॅपी ट्री फाउंडेशनने एक जेल तयार केलं आहे. एक नोटपॅड आणि पेन घेऊन तिथं लोक तासनतास एकटे बसू किंवा फिरू शकतात. काही कंपन्यांमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे. प्रत्येकच जण तणाखाली आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तामध्ये या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली आहे. याला त्यांनी 'हिटिंग मंग कल्चर' म्हटलं आहे. तूर्तास दक्षिण कोरियातील हिटिंग मग कल्चर जगभर प्रसिद्धीस पावत आहे, असं या अभ्यासातील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
First published:

Tags: Health, Lifestyle, Mental health, South korea

पुढील बातम्या