मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Sunlight : दररोज इतका वेळ सूर्यप्रकाश अंगावर घेणं आहे खूप फायदेशीर; अनेक आजार राहतात दूर

Sunlight : दररोज इतका वेळ सूर्यप्रकाश अंगावर घेणं आहे खूप फायदेशीर; अनेक आजार राहतात दूर

संशोधकांनी एका नवीन अभ्यासाच्या आधारे सांगितले आहे की, सूर्याच्या अतिनील किरणांच्या (Ultra Violet Rays) संपर्कात आल्याने ऑटो-इम्यून (auto-immune diseases) रोगांपासून संरक्षण मिळतं.

संशोधकांनी एका नवीन अभ्यासाच्या आधारे सांगितले आहे की, सूर्याच्या अतिनील किरणांच्या (Ultra Violet Rays) संपर्कात आल्याने ऑटो-इम्यून (auto-immune diseases) रोगांपासून संरक्षण मिळतं.

संशोधकांनी एका नवीन अभ्यासाच्या आधारे सांगितले आहे की, सूर्याच्या अतिनील किरणांच्या (Ultra Violet Rays) संपर्कात आल्याने ऑटो-इम्यून (auto-immune diseases) रोगांपासून संरक्षण मिळतं.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : सूर्यप्रकाश (Sunlight) नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते (Benefits of Sunlight). आता यासंदर्भात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संशोधकांनी एका नवीन अभ्यासाच्या आधारे सांगितले आहे की, अतिनील किरणांच्या (Ultra Violet Rays) संपर्कात आल्याने व्हिटॅमिन-डी वाढते. त्यामुळे ऑटो-इम्यून (auto-immune diseases) रोगांपासून संरक्षण मिळते.

या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकन अकादमी ऑफ न्युरोलॉजीच्या (American Academy of Neurology) जर्नलच्या ऑनलाइन अंकात प्रसिद्ध झाले आहेत.

संशोधकांच्या मते, सूर्यप्रकाश सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. या अभ्यासामध्ये इतर संशोधकांनी केलेल्या पूर्वीच्या अभ्यासाचाही समावेश केला आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की बालपणात अतिनील किरणांच्या संपर्कात येण्यामुळे MS किंवा मल्टीपल स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) होण्याची शक्यता कमी आहे. MS मध्ये मज्जातंतूंच्या (nerve damage) नुकसानीमुळे मेंदू आणि शरीराच्या संपर्कावर परिणाम होतो, ज्यामुळे दृष्टी कमी होणे, वेदना, थकवा इत्यादी अनेक समस्या (Benefits of basking in sun) उद्भवतात.

हे वाचा - कोरोनाचा आपल्या शरीरावर होतोय गंभीर परिणाम; बरे झालेल्यांमध्ये दिसतायत वेगळ्याच समस्या

संशोधकांनी या अभ्यासात 332 लोकांचा समावेश केला होता. ज्यांचे वय 3 ते 22 वर्षे दरम्यान होते आणि त्यांना एमएस म्हणजेच मल्टीपल स्क्लेरोसिस होता. या सहभागींच्या राहण्याची जागा आणि सूर्यप्रकाशाच्या वेळेची तुलना 534 सहभागींशी करण्यात आली ज्यांना एमएस नव्हता.

या अभ्यासासाठी संशोधकांनी एक प्रश्नावली देखील भरली. जे एकतर सहभागींनी स्वतः किंवा त्यांच्या पालकांनी भरली होती. सहभागी लोक सूर्यप्रकाशात किती वेळ थांबले आणि त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे शोधण्याचा संशोधकांचा उद्देश होता. त्यांना रोग टाळण्यास मदत झाली का? तपासले.

जेव्हा संशोधकांनी डेटाचे विश्लेषण केले तेव्हा असे आढळून आले की, ज्या सहभागींना दररोज 30 मिनिटे ते एक तास सूर्यप्रकाश मिळाला, त्यांना दररोज सरासरी 30 मिनिटांपेक्षा कमी सूर्यप्रकाश मिळणाऱ्यांच्या तुलनेत मल्टिपल स्क्लेरोसिसचा धोका 52 टक्के कमी झाला.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, एमएस असलेल्या 19 टक्के सहभागींनी सांगितले की त्यांनी मागील उन्हाळ्यात दररोज सूर्यप्रकाशात 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ घालवला होता, ज्यांच्या तुलनेत एमएस नसलेल्या लोकांपैकी फक्त 6 टक्के लोक दिवसात 30 मिनिटे सूर्यप्रकाशात वेळ घालवतात.

हे वाचा - Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका

कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातील न्यूरोलॉजिस्ट आणि अभ्यासाचे सह-लेखक इमॅन्युएल वॉबंट यांच्या मते, सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डीची पातळी वाढवण्यासाठी ओळखला जातो. सूर्यप्रकाश त्वचेतील अशा रोगप्रतिकारक पेशींना देखील उत्तेजित करतो, जे एमएस सारख्या रोगांशी लढण्यात महत्वाची भूमिका बजावतात. व्हिटॅमिन-डी रोगप्रतिकारक पेशींचे जैविक कार्य देखील बदलू शकते आणि अशा प्रकारे स्वयं-प्रतिकार रोगांपासून संरक्षण करण्यात चांगली भूमिका बजावू शकतो.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle