बीड, 25 सप्टेंबर : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या काय झाडी…काय डोंगार…डायलॉगची सर्वांनाच भुरळ पडलेली आहे. आता याला भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील अपवाद नाहीत. शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची पुनरावृत्ती पंकजा मुंडे यांनी केली. यावेळी पंकजा मुंडेंनी ‘काय हायवे…काय हॉटेल’ म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली. बीड येथील मांजरसुंबा येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगार आणि मुकदमांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी राष्ट्रीय हायवेच्या कामावर समाधान व्यक्त करत ‘काय हायवे… काय हॉटेल… सर्व कसं ओकेच..’ असं म्हणताच उपस्थितांमधून एकच हशा पिकली.
शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची पंकजा मुंडे यांना भुरळ pic.twitter.com/sUgSEn79mn
— News18Lokmat (@News18lokmat) September 25, 2022
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत त्या मधला एक कार्यक्रम मध्ये स्वच्छता पंधरवडा यानिमित्त बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांनी हातात झाडू घेवून मंदिर मज्जित आणि बौद्ध विहार या ठिकाणी स्वतः स्वच्छता केली. (‘राज ठाकरेंचं ऐकलं असतं तर शिंदे गटावर ही वेळ आली नसती’, मनसे नेत्याचा गौप्यस्फोट) यादरम्यान बीड शहरातील बौद्ध विहार परिसर आणि बौद्ध विहार त्यानंतर बीड जिल्ह्यातली प्रसिद्ध दर्गा शहेनशावली या दर्गेत जाऊन या दर्गेची स्वच्छता करत स्वतः हातात झाडू घेऊन या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. त्याचबरोबर बीडचा प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर या ठिकाणी देखील महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊन या परिसरात देखील स्वच्छता मोहीम भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राबवली. यादरम्यान अनेक कार्यकर्ते अनेक नागरिक आणि स्वच्छता टीम या पंधरवड्या मोहिमेमध्ये सामील झाले होते स्वतः पंकजा मुंडे या झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेसाठी निघाला असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहिला मिळालं.