जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पाकिस्तानात लाखो लोकांच्या रोजगारावर संकट, सुझुकी मोटरसह या कंपन्यांनी प्लांट केला बंद

पाकिस्तानात लाखो लोकांच्या रोजगारावर संकट, सुझुकी मोटरसह या कंपन्यांनी प्लांट केला बंद

पाकिस्तानात लाखो लोकांच्या रोजगारावर संकट, सुझुकी मोटरसह या कंपन्यांनी प्लांट केला बंद

पाकिस्तानची बिकट स्थिती, नोकऱ्यांवरही टांगती तलवार; अनेक कंपन्यांनी प्लांट केले बंद

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : पाकिस्तानमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. तिथे जीवनावश्यक वस्तूच 300 रुपयांपासून मिळत आहेत. तर गॅस सिलिंडरच्या किंमती 10 हजारच्या आसपास पोहोचल्या आहेत. कंगाल झालेल्या पाकिस्तानात आता बेरोजगारी वाढणार आहे. याचं कारण म्हणजे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. आर्थिक तंगीमुळे अनेक कंपन्यांनी पाकिस्तानातील आपले प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मारुती सुझुकी देखील आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसमोर आता रोजगाराची नवी समस्या निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील कच्च्या मालाचा तुटवडा आणि चलनाच्या कमतरतेमुळे गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानातील अनेक मोठ्या कंपन्यांनी काम बंद केलं. देशाच्या अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. कच्चा माल आणि परकीय चलनाच्या कमतरतेमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी आपले कामकाज बंद करत असल्याचे जाहीर केले आहे.

आर्थिक मंदीचे संकेत? US फेडरल बँकेनं सलग आठव्यांदा वाढवले व्याजदर

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या स्थानिक युनिटने 2 फेब्रुवारीपर्यंत त्यांचे उत्पादन बंद केलं होतं. परकिय चलनाचा तुटवडा, कमालीची वाढलेली महागाई अशा सगळ्या गोष्टी पाहता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे कंपनीने आपला प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला. टायर आणि ट्यूब बनवणाऱ्या घनधारा टायर अँड रबर कंपनीने कच्च्या मालाच्या आयातीत मोठ्या अडचणींमुळे 13 फेब्रुवारी रोजी आपली सेवा बंद केली. अहवालानुसार, सुझुकी मोटर कॉर्पने आता 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत पाकिस्तान-आधारित योजना ऑपरेशन्स बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की त्यांच्या प्लांटमधील अनेक आवश्यक वस्तू संपल्या आहेत आणि परकीय चलनाच्या कमतरतेमुळे वाहनांचे काही भाग आयात केले जात नाहीत. अशा स्थितीत कंपनीने काही दिवस प्लांटचे कामकाज बंद केले आहे. याशिवाय खलिद सिराज टेक्सटाईल मिल्स या धाग्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने 31 मार्च 2023 पर्यंत आपले कारखाने बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

300 रुपयांवर पोहोचलं पेट्रोल, कंगाल पाकिस्तानमधील नागरिकांवर उपासमारीची वेळ

Engro Fertilizers Limited, Fauji Fertilizer Bin Kasim Limited, Nishat Chunian Limited, Amreli Steels Limited, Millat Tractors Limited आणि Diamond Industries Limited. सारख्या कंपन्यांच्या वतीने ऑपरेशन्स एकतर पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत किंवा मंदावल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

महागाईमुळे पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. दरम्यान, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्याने प्रचंड बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, मोठ्या कार कंपनीच्या युनिट्स बंद झाल्यामुळे पाकिस्तानमधील कार विक्रीवर परिणाम झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात