मराठी बातम्या /बातम्या /मनी /आर्थिक मंदीचे संकेत? US फेडरल बँकेनं सलग आठव्यांदा वाढवले व्याजदर

आर्थिक मंदीचे संकेत? US फेडरल बँकेनं सलग आठव्यांदा वाढवले व्याजदर

फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या प्रमुख व्याजदरात एक चतुर्थांश अंकांनी वाढ केली.

फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या प्रमुख व्याजदरात एक चतुर्थांश अंकांनी वाढ केली.

फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या प्रमुख व्याजदरात एक चतुर्थांश अंकांनी वाढ केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : US फेडची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा एकदा महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदर वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा अमेरिकेच्या चलनावर आणि आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम देखील दिसून आला.

फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या प्रमुख व्याजदरात एक चतुर्थांश अंकांनी वाढ केली. फेडरल रिझर्व्हने मार्चपासून केलेली ही आठवी वाढ आहे. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयानंतर आता व्याजदर 4.50 वरून 4.75 अंकांवर गेले आहेत. पुढच्या काळातही दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे, असे संकेतही फेडने दिले आहेत.

फेडने यापूर्वीही व्याजदरात मोठी वाढ केली होती. मात्र, ही वाढ मागील वाढीच्या तुलनेत कमी आहे. फेडच्या या निर्णयामुळे अनेक ग्राहक आणि व्यावसायिक कर्जांचा खर्च वाढेल आणि फेडने घेतलेल्या निर्णयामुळे मंदीचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

Inflation: जगभरात महागाईनं हाहाकार! युरोपमधील 19 देशांमध्ये दर 10 टक्क्यांच्या पार, तर भारतात...

याचा सर्वात मोठा परिणाम पेट्रोल-डिझेल आणि ज्या वस्तू भारतात आयात केल्या जातात त्यावर होणार आहे. भारताताला क्रूड ऑइल आयात करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. त्याच बरोबर इतर वस्तूंसाठी देखील जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

दोन दिवसांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे की, महागाई काही प्रमाणात कमी झाली असली तरी ती अजूनही उच्च पातळीवर आहे. १५ डिसेंबरलाच फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.५50 बेसिस पॉईंटने वाढ केली होती. या वर्षाच्या अखेरीस व्याजदरात 0.75 टक्के वाढ अपेक्षित आहे.

सरकारी कर्मचारी असो की खाजगी, कसा वाढतो महागाई भत्ता? तुम्हालाही करता येईल गणित

यूएस फेडच्या या निर्णयाचा फटका अमेरिकेसह अनेक देशांना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेला सध्या चार दशकांतील सर्वात मोठ्या महागाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळेच अमेरिकेला सातत्याने व्याजदरात वाढ करावी लागत आहे.

First published:

Tags: Inflation, Money