पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट आहे. तिथे आणीबाणीची स्थिती आहे. महागाई सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. पेट्रोलपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी आता अडीचशेच्या पुढेच आहेत.
चिकन, मटण याची तर गोष्ट न केलेली बरी. चिकन 800 तर बोनलेस चिकन 1500 पर्यंत मिळत आहे. पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पीठ १२० रुपये/किलो, तांदूळ 200 रुपये/किलो, बटाटा रु.70/किलो, टोमॅटो 130 रुपये/किलो, चिकन 780 रुपये/किलो मिळत आहेत.