जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ऑनड्यूटी केली वटपौर्णिमा

ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ऑनड्यूटी केली वटपौर्णिमा

ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ऑनड्यूटी केली वटपौर्णिमा

काल वटपौर्णिमा हा सण साध्यापद्धतीने का होईना साजरा करण्यात आला. पण आपल्या पोलीस दलातील महिलांनी स्त्रीचं आणि तिच्या कर्तव्याचं एक अनोख रुप आपल्याला दाखवलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 जून : राज्यावर कोरोनाचं खूप मोठं संकट कोसळलं आहे. या महामारीमुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, काहींचे संसार तुटले तर माणूकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटनाही समोर आल्या. अशात आपल्या जीवाची परवा न करता दिवसरात्र झटणारे पोलीस आणि डॉक्टर यांच्या कामाचं काही मोल नाही. काल वटपौर्णिमा हा सण साध्यापद्धतीने का होईना साजरा करण्यात आला. पण आपल्या पोलीस दलातील महिलांनी स्त्रीचं आणि तिच्या कर्तव्याचं एक अनोख रुप आपल्याला दाखवलं आहे. वटपौर्णिमा म्हटलं की, घरात गोडाचं जेवण, देवाला नैवेद्य, नवीन साडी, श्रृगांर अशा अनेक गोष्टी आल्या. पण पोलीस दलात काम करणाऱ्या या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला सुंदरचं लेणं माणून पोलीस गणवेशातच वडाची पूजा केली आहे. पुण्यातल्या ‘मर्दानी’ने केली मोठी कारवाई, अवैध गांजा विकणाऱ्यांमध्ये खळबळ गृहमंत्री अनिल देशमुखांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये पोलीस महिला वडाची पूजा करत असल्याचे काही फोटो शेअर करत त्यांनी या महिलांचं कौतूक केलं आहे. खरंतर आपलं काम आणि आपली देशसेवा यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस दलाचे आभारच मानायला हवेत. आज त्यांच्या सतर्कतेमुळे आपण सुरक्षित आणि आनंदाने सण साजरे करू शकतो. चक्रीवादळानं मुंबईचं आर्थिक कंबरडं मोडलं, या शहरात झालं सव्वा कोटीचं नुकसान अनिल देशमुखांनी ट्वीट करताना लिहलं की, ‘काल वटपौर्णिमा सण सगळीकडे साजरा करण्यात आला. #Covid19 च्या लढ्यात लढणाऱ्या आमच्या महिला #पोलीस भगिनींनी कर्तव्य बजावत असतानाच वटपौर्णिमा साजरी करून हा सण आनंदात साजरा केला. या भगिणीचं कर्तव्याप्रती समर्पण #महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.’

जाहिरात

खरंच, आपल्या कर्तव्याची आठवण ठेवत या देशासाठी लढणाऱ्या महिलांना न्यूज18 लोकमतचाही सलाम! शिवनेरीवर आकाशी उधळला भंडारा, शिवराज्यभिषेक सोहळ्यातून महाराजांना मानाचा मुजरा संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात