Home /News /news /

साईबाबांचे मंदिर उघडा, शिर्डीत मनसेचे आक्रमक आंदोलन

साईबाबांचे मंदिर उघडा, शिर्डीत मनसेचे आक्रमक आंदोलन

साईमंदिर खुले करा अन्यथा आम्ही स्वतः खुले करून मंदिरात प्रवेश करू, असा इशारा मनसेनं दिला होता

शिर्डी, 13 सप्टेंबर : कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाउन लागू झाला. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील मंदिर अद्यापही बंद आहे. केंद्राने सुचना दिल्यानंतरही राज्यातील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता शिर्डीतील साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी मनसे आंदोलन केले. शिर्डीचे साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करा, संस्थान कर्मचार्यांचा वेतन कपातीचा निर्णय मागे घ्या, या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने शिर्डीत आंदोलन करण्यात आले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये बाळाला जीवे मारण्याची धमकी देऊन आईवर बलात्कार बाळा नांदगावकर यांनी  साईबाबांना साष्टांग दंडवत घातले आणि  मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले व्हावे आणि संस्थान कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घ्यावा, असं साकडं साईबाबांना घातलं. साईमंदिर खुले करा अन्यथा आम्ही स्वतः खुले करून मंदिरात प्रवेश करू, असा इशारा मनसेनं दिला होता. त्यामुळे साई मंदिराच्या परिसरात  पोलीस प्रशासन आणि संस्थानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. सकाळ पासूनच शिर्डीच्या साईमंदिराला सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज ठाकरेंनी लिहिले होते सरकारला पत्र विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी  अनलॉक 4.0मध्ये ठाकरे सरकारनं काही सवलती देत हॉटेल्स आणि मॉल खुली करण्याची परवानगी दिली. मात्र, अद्याप मंदिरांना परवानगी देण्यात आलेली नाह. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची कानउघडणी केली. राज ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहून "सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?", असा सवाल विचारला.

मुलांसाठी ही LIC पॉलिसी खरेदी केल्यास नाही घ्यावं लागणार शैक्षणिक कर्ज

तसंच, 'अनलॉक' क्रमांक अमुक तमुक अशा 'अनलॉक' प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असे खडेबोलही सरकारला सुनावले होते.
Published by:sachin Salve
First published:

Tags: MNS, Saibaba, Shirdi

पुढील बातम्या