मुलांसाठी ही LIC पॉलिसी खरेदी केल्यास नाही घ्यावं लागणार शैक्षणिक कर्ज, वाचा सविस्तर

मुलांसाठी ही LIC पॉलिसी खरेदी केल्यास नाही घ्यावं लागणार शैक्षणिक कर्ज, वाचा सविस्तर

एलआयसीची एक महत्त्वाची योजना आहे जी लहान मुलांसाठी खास बनवण्यात आली आहे. LIC ची 'न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी क प्‍लान' (LIC NEW CHILDREN'S MONEY BACK PLAN) लहान मुलांच्या भविष्यासाठी फायद्याची आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर: सध्याच्या काळात बचतीबरोबरच गुंतवणूक देखील महत्त्वाची आहे. अशावेळी गुंतवणूक करण्यासाठी देशात एलआयसीला अधिक पसंती दिली जाते. एलआयसी (LIC) देशातील एक विश्वासार्ह कंपनीपैकी एक आहे. सरकारद्वावे संचालित या कंपनीतील पॉलिसीमध्ये गुंतवणुकीवर ग्राहकांचे अनेक फायदे आहेत. वाढत्या महागाईच्या काळात सर्वांसाठी हे आवश्यक आहे की, तुमच्या मेहनतीतून मिळालेल्या कमाईची काहीशी रक्कम तरी गुंतवणे गरजेचे बनले आहे.

एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचप्रमाणे मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी देखील काही विशेष योजना एलआयसी कडून देण्यात येत आहेत. एलआयसीची एक महत्त्वाची योजना आहे जी लहान मुलांसाठी खास बनवण्यात आली आहे. LIC ची 'न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी क प्‍लान' (LIC NEW CHILDREN'S MONEY BACK PLAN) लहान मुलांच्या भविष्यासाठी फायद्याची आहे.

या पॉलिसीतील महत्त्वाचे मुद्दे

-ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीतकमी वयोमर्यादा 0 वर्षे आहे

-ही विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 12 वर्षे आहे

(हे वाचा-Post Office बचत खात्याच्या नियमात बदल, थेट खात्यात ट्रान्सफर होणार सरकारी सबसिडी)

-या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी रक्कम 100000 रुपये आहे, जास्तीत कोणतीही मर्यादा नाही आहे

-प्रीमियम वेवर बेनिफिट राइडर हा पर्याय उपलब्ध आहे

-पॉलिसीधारकाला 18, 20 आणि 22 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर सम अश्यूर्डची 20 टक्के रक्कम मिळेल.

मॅच्यूरिटी बेनिफिट

पॉलिसीच्या मॅच्यूरिटीवेळी (विमाधारकाचा पॉलिसीच्या कालावधी दरम्यान मृत्यू न झाल्यास) पॉलिसीधारकाला विम्याच्या रकमेची उर्वरित 40 टक्के बोनससहित मिळेल.

डेथ बेनिफिट

पॉलिसीच्या कालावधी दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. विशेष म्हणजे एकूण पेमेंटच्या 105 टक्के डेथ बेनिफिट मिळतो.

(हे वाचा-बेरोजगार झालेल्या लोकांसाठी खूशखबर! तुमचा अर्धा पगार देणार सरकार; वाचा सविस्तर)

एलआयसीची ही पॉलिसी मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते. मुलांच्या महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणावेळी या पॉलिसीतून बेनिफिट मिळते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 13, 2020, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading