मुंबई, 21 जून : आपण ट्रेन आणि रेल्वेमध्ये भिकाऱ्यांना पैसे मागताना पाहिलं असेलच पण तुम्ही कधी विमानात भिकारी पाहिला आहे का? पण असं खरंच झालं आहे. कतर एयरवेजच्या दोहाहून सिरोंजला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एक वृद्ध व्यक्ती अचानक उठला आणि त्याने फ्लाईटमध्ये पैसे मागण्यास सुरूवात केली. वृद्ध व्यक्ती विमानात अचानक पैसे मागायला लागल्याने सगळे जण चकित झाले. पण फ्लाईट टेक ऑफ होणार असतानाच हा वृद्ध उभं राहून पैसे मागत असल्याने काहींनी त्याला पैसे देऊन खाली बसवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा
ना घोडा, ना गाडी, थेट जेसीबीतून घरी आणलं नवरीला !
InternationalYogaDay2018 : या फिट सेलिब्रिटींचा हा आहे फिटनेस फंडा !
आता हे सगळं इथेच थांबलं असंत तर बरं झालं असंत, पण फ्लाईटच्या टेक ऑफ नंतर या व्यक्तीने एक प्लास्टिकची पिशवी काढली आणि पुन्हा सगळ्यांकडून पैसे मागण्यास सुरूवात केली. एयरहोस्टेस पासून ते विमानतल्या कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांकडून त्याने पैसे मागण्यास सुरूवात केली. सगळ्यांनी त्याला खाली बसायला सांगितलं पण त्याने काही कोणाचं ऐकलं नाही. हो, आता यातल्या काही प्रवाशांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ काढला आणि तो फेसबुकवर शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या व्यक्तीबद्दल फार कोणती माहिती अद्याप मिळाली नाही आहे. अनेकांनी त्याला पाकिस्थानी म्हटलं आहे. खरंतर दोहाहून सिरोंजला जाणाऱ्या फ्लाईटच्या तिकिटाची किंमत 600 यूरोपर्यंत होती. त्यामुळे सगळे पैसे तिकिटासाठी गेल्याने तो व्यक्ती सगळ्यांकडून पैसे मागत असल्याचंही बोललं जात आहे.