मुंबई, 21 जून : आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. त्यामुळे जगभरात आज योगा दिन साजरा केला जात आहे. पण या सगळ्यात सर्वात जास्त फिट असतात ते सेलिब्रिटी. जाणून घेऊयात त्यांचा योगा आणि फिटनेस फंडा.
आता गोष्ट फिटनेसची आहे तर त्यात सगळ्यात आधी नाव येतं ते बिपाशा बासूचं. बिपाशा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज योगा करते. ती रोज प्राणायम करते.
डोकेदुखी थांबवण्यासाठीसुद्धा योगा करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टीची योगाची एक डीव्हीडीदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जॅकलीन फर्नांडिस स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसातून 108 वेळा सूर्य नमस्कार करते. ती नियमितपणे आष्ठांग योग करते.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फिटनेस फॉर्मूला म्हणजे योगा, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग. ती रोज योगा, प्राणायम, आसन आणि मेडिटेशन करते आणि स्वत:ला फिट ठेवते.
कंगाना राणावतला बॉलिवूडची राणी म्हटलं जातं. याच्यामागंचं गुपित म्हणजे तिने योगा आणि स्वत:च्या फिटनेसची काळजी घेत स्वत:ला सगळ्यांपेक्षा वेगळं सिद्ध केलं आहे.
मलायका अरोरा एक फिटनेस फ्रीक आहे. त्यामुळे तिचे योगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी असतात.
योगाला बॉलिवूडमध्ये ट्रेंड बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती आहे अभिनेत्री करिना कपूर. तिला पाहून बॉलिवूडमध्ये अर्जून रामपाल पासून अनेक कलाकारांनी योगा करण्यास सुरूवात केली. ती रोज 50 वेळा सूर्य नमस्कार करते. तिच्या प्रेग्नेंसीनंतरही तिने योगा करणं सोडलं नाही.
बॉलिवूडमध्ये ज्यांना सगळ्या तरूण म्हटलं जातं ते अनिल कपूर इतके फिट राहण्यामागंचं सगळ्यात मोठं राज म्हणजे योगा. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सोनम कपूरदेखील स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा करते.