नवी दिल्ली, 01 जुलै : केंद्र सरकारच्या वतीने रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी योजना आणण्याची तयारी करण्यात येत आहे. या योजेनमध्ये अपघातग्रस्तांचे कॅशलेस उपचार केले जातील. या व्यतिरिक्त अपघातग्रस्त लोकांच्या उपचारासाठी केंद्र सरकार मोटर वाहन 'अपघात निधी' स्थापन करणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही योजना आखली आहे.
एखाद्या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या उपचारासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने अडीच लाख रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत योजना राबविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.
या योजनेत भारतीय किंवा परदेशी नागरिकांचा जर भारतात अपघात झाला तर ते सर्व नागरिक पात्र ठरतील. त्याचबरोबर केंद्राने प्रस्तावित योजनेबाबत सर्व राज्य सरकारच्या मुख्य सचिवांकडून 10 जुलै पर्यंत अभिप्राय मागविला आहे. केंद्र सरकार रस्ते अपघातातील पीडितांवर कॅशलेस उपचारांसाठी एक योजना तयार करीत आहे, केंद्रीय परिवहन मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या मंत्र्याने मुंबई पोलिसांच्या ‘या’ निर्णयावर टीका
या योजनेत पीडितांच्या उपचारासाठी निधी तयार करण्याची तरतूद असणार आहे. केंद्र सरकार रस्ते अपघातातील पीडितांवर कॅशलेस उपचारांसाठी एक योजना तयार करीत आहे,केंद्रीय परिवहन मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. या योजनेत पीडितांच्या उपचारासाठी निधी तयार करण्याची तरतूद असणार आहे. पीएमजेवायसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ही नोडल एजन्सी आहे. देशभरातील जवळपास 21000 हॉस्पिटल्सबरोबर हा करार करण्यात येणार आहेत.
चीनला चहुबाजूने वेढलं! आता ऑस्ट्रेलियन सैन्यानेही केला घेराव सुरू
त्यामुळे रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार, दरवर्षी भारतात रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होत असतो. दर दिवशी सरासरी 1200 लोक रस्ते अपघातांना बळी पडतात यात त्यापैकी सुमारे 400 लोक मृत्युमुखी पडत असतात.
संपादन - सचिन साळवे मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.