मुंबई, 1 जुलै : राजस्थानातील उदयपूर (Udaipur tailor Kanhaiya Lal’s killed) येथे नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्याच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणात (National Investigation Agency) NIA कडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घडलेल्या हत्या प्रकरणाशी उदयपूरमधील प्रकरण जोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालाल यांनी भाजपमधून निलंबित केलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती, यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. त्या दोघांचे पाकिस्तानातील एक कट्टरपंथी समुहाशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रात काय घडलं होतं? 21 जून रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे एक मेडिकल प्रोफेशनल उमेश कोल्हे यांची कथितरित्या नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानंतर हत्या करण्यात आली होती. आरोपींनी कोल्हे यांची गळा कापून हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी 25 जानेवारी रोजी गुजरातच्या धांडुका भागात एका दुकानदाराची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. मृत झालेल्या व्यक्तीनेही पैगंबर मोहम्मदबद्दल पोस्ट केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gujrat, Rajasthan