Home /News /national /

अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी अटक, हे आहे प्रकरण

अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी अटक, हे आहे प्रकरण

मोहम्मद जुबेरला 2020 मध्ये एका वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बोलावले होते.

    नवी दिल्ली, 27 जून : अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) यांना दिल्ली पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी (Hurting Religious Sentiments) अटक केली आहे. मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी पुलिस (Delhi Police) आयपीसी कलम 153/295 अंतर्गत अटक केली आहे. मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या आईएफएसओ युनिटने अटक केली आहे. जुबेर यांच्याविरोधात 153a/295a अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणाच्या चौकशीसाठी जुबेर यांना आज बोलावण्यात आले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुरेशा पुराव्याच्या आधारे जुबेरला अटक करण्यात आली आहे, असा दावा पोलिसांनी केला. जुबेरला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. दिल्ली पोलिसांनी काय सांगितले - दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद जुबेरने एका विशिष्ट धार्मिक समुदायाविरुद्ध पोस्ट केलेले चित्र आणि शब्द अत्यंत चिथावणीखोर आणि हेतुपुरस्सर आहेत, जे लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी पुरेसे आहे. यामुळे सार्वजनिक शांतता राखणे कठीण होऊ शकते. या पोस्टच्या आधारे वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेरच्या बाजूने पोलिसांवर आरोप - ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा म्हणाले की, मोहम्मद जुबेरला 2020 मध्ये एका वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बोलावले होते. या प्रकरणात त्याला उच्च न्यायालयाकडून अटकेतून सूट देण्यात आली आहे. तर आज संध्याकाळी 6:45 वाजता आम्हाला कळवण्यात आले की, त्याला अन्य एका प्रकरणात एफआयआर दाखल केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. हेही वाचा - मित्राने पत्नीच्या गालाला केला स्पर्श, विरोध करताच पतीचा डोळाच फोडला; परिस्थिती गंभीर ते म्हणाले की, मोहम्मद जुबेरला या प्रकरणी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. ज्या कलमांमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे, त्या कलमांमध्ये नोटीस देण्याची तरतूद आहे. मात्र, तसे करण्यात आलेले नाही. अनेक वेळा विनंती करूनही आम्हाला एफआयआरची प्रत देण्यात आली नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Delhi Police

    पुढील बातम्या