Home /News /news /

मुंबईत पुढच्या 3-4 आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना, महापालिकेने दिली माहिती

मुंबईत पुढच्या 3-4 आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना, महापालिकेने दिली माहिती

 पुण्यात सोमवारी (21 सप्टेंबर) दिवसभरात 854 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

पुण्यात सोमवारी (21 सप्टेंबर) दिवसभरात 854 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

मुंबईत पुढील 3 ते 4 आठवड्यांमध्ये दररोज 2000 हून अधिक कोरोना प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

  विनया देशपांडे, प्रतिनिधी मुंबई, 12 सप्टेंबर : मुंबईकरांची चिंता वाढवणारी माहिती महानगरपालिकेतून समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतही रोज कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत. अशात बीएमसीच्या वरिष्ठ सूत्रांनी CNN News18 ला कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील 3 ते 4 आठवड्यांमध्ये दररोज 2000 हून अधिक कोरोना प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मोठ्या संख्येनं रोज कोरोना रुग्णांची नोंद होत असली तरी मुंबईतील वाढती संख्या ही कोरोनाची दुसरी लाट नाही असं पालिकेचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची संख्या 3-4 आठवड्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यानंतर आकडा कमी होत जाईल. सध्या शहरात रोज सुमारे 16,000 चाचण्या घेतल्या जातात. यात जलद चाचण्या आणि RT PCR चाचण्यांचाही समावेश आहे. मुंबईत आरटी पीसीआर चाचणी क्षमतेचा पुरेपूर उपयोग केला जात आहे असं पालिकेनं म्हटलं आहे. रियाने चौकशीत घेतली 2 स्टार अभिनेत्यांची नावं, सुशांतच्या डॅग्ज पार्टीचा खुलासा दरम्यान, राज्यात शुक्रवारी 24 हजार 886 रूग्ण आढळले आहे. त्यामुळे रूग्णांची एकूण संख्या ही 10 लाख 15 हजार 681 एवढी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला. तर 14804 जणांना डिस्चार्ज मिळाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.83वर गेला आहे. गेल्या दिवसांपासून दररोज 20 हजारांच्या वर नवे रूग्ण आढळून येत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. ...तर पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू होणार का? अजित पवारांची महत्त्वाची सूचना रूग्णसंख्या वाढण्यास पूर्ववत झालेले व्यवहार, वाढणारी गर्दी, लोकांचा बेफिकीरपणा, मास्क न लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं ही मुख्य कारणं आहेत असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे. कोरोनाची प्रसार आता ग्रामीण भागात झाल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असतांनाच आता कोरोनाची भीती कमी होत आहे. त्यामुळे लोक जास्त बेफिकीर झाल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.
  Published by:Renuka Dhaybar
  First published:

  Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms, Lockdown

  पुढील बातम्या