नवी दिल्ली, 17 जुलै : यूके, यूएसमधील कोरोना लशीच्या (CORONA VACCINE) मानवी चाचणीनंतर आता भारतातील लशीच्या मानवी चाचणीचीही (human trial) महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भारतात कोवॅक्सिन (COVAXIN) या लशीचं ह्युमन ट्रायल सुरू झालं आहे. ह्युमन ट्रायलमध्ये ही लस सुरुवातीला सकारात्मक परिणाम देत असल्याचं दिसून आलं आहे. हरयाणाच्या पीजीआय रोहतक या वैद्यकीय संस्थेमध्ये ज्या व्यक्तींना ही लस देण्यात आली. त्यांच्यावर लशीचा कोणताही दुष्परिणाम झाला नाही.
हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने ही लस तयार केली आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्यातील नेशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसह मिळून ही लस तयार करण्यात आली आहे. प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर या लशीच्या ह्युमन ट्रायलला CDSCO करून परवानगी मिळाली आणि लशीचं ह्युमन ट्रायल सुरू झालं.
देशातल्या विविध राज्यांमधल्या 12 हॉस्पिटल्समध्ये या लशीची चाचणी केली जाते आहे. त्यामध्ये पीजीआय रोहतक वैद्यकीय संस्थेचाही समावेश आहे. या ठिकाणी तीन जणांना ही लस देण्यात आली.
Human trial with Corona vaccine (COVAXIN) of Bharat Biotech started at PGI Rohtak today. Three subjects were enrolled today. All have tolerated the vaccine very well. There were no adverse efforts.
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) July 17, 2020
हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी सांगितलं, पीजीआय रोहतमध्ये आज कोरोना लस कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. तीन जणांना आज ही लस देण्यात आली. लशीचा त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही.
हे वाचा - संपूर्ण जगाला कोरोना लस पुरवण्यात भारत सक्षम; बिल गेट्स यांना विश्वास
निरोगी लोकांना ही लस दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचे सगळे रिपोर्ट्स हे ICMRला पाठविले जाणार आहेत. लवकरच या प्रयोगाला सुरुवात होणार असून त्यासाठी स्वच्छेने आलेल्या 200 आरोग्य कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. या लसीला BBV152 COVID vaccine हे नाव देण्यात आलं आहे.