Home /News /maharashtra /

मोठी बातमी! स्वदेशी कोरोना लशीच्या पहिल्या चाचणीसाठी महाराष्ट्रात 60 जण तयार; ऑगस्टमध्ये दिली जाणार लस

मोठी बातमी! स्वदेशी कोरोना लशीच्या पहिल्या चाचणीसाठी महाराष्ट्रात 60 जण तयार; ऑगस्टमध्ये दिली जाणार लस

कोवॅक्सिन (Covaxin) ची चाचणी आता महाराष्ट्रातली सुरू होईल. कुठल्या रुग्णालयात होणार ही चाचणी आणि कुणावर होणार? पहिल्या स्वदेशी लशीसंदर्भातली सगळी महत्त्वाची बातमी

नागपूर, 18 जुलै  : Coronavirus वर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस तयार करण्याची तयारी साऱ्या जगभर सुरू आहे. या लशीची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत आहे. भारतात तयार होत असलेल्या कोवॅक्सिन (Covaxin) नावाच्या लशीची पहिली मानवी चाचणी येत्या ऑगस्टमध्ये सुरू होईल. त्यासाठी महाराष्ट्रातल्या 60 जणांची निवड करण्यात आली आहे.  त्यांना या पहिल्या चाचणीअंतर्गत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात (COVID Vaccine) लस टोचण्यात येईल. नागपूरमध्ये ही चाचणी केली जाणार आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकच्या वतीने कोवॅक्सिनची निर्मिती केली जात आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या (NIV) सहभागातून ही लस विकसित केली जात आहे. याला ICMR ने मान्यता दिली आहे आणि पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. पहिली लस बिहारमध्ये पाटण्यातल्या एम्स रुग्णालयात टोचण्यात आली. त्यानंतर हरियाणातही काही जणांना लस देण्यात आली. हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीजीआय रोहतमध्ये कोरोना लस कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. 17 जुलैला तीन जणांना ही लस देण्यात आली. लशीचा त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. आता महाराष्ट्रातल्या काही स्वयंसेवकांवरही या लशीचा प्रयोग होणार आहे. त्यासाठी स्वेच्छेने नोंदणी केलेल्या 60 निरोगी व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. नागपूरच्या रुग्णालयात याची चाचणी होईल. नागपूर इथल्या डॉ. चंद्रशेख गिल्लूरकर यांच्या गिल्लूरकर हॉस्पिटलची महाराष्ट्रातल्या चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. तिथे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या चाचण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोरोना लशीची माहिती हॅक करण्याचा केला जात आहे प्रयत्न, 'या' देशावर आरोप पहिल्या टप्प्यात दिल्ली, रोहतांग, हैदराबाद, पाटणा या 4 ठिकाणी पहिली चाचणी होईल. त्याचे परिणाम पाहून पुढच्या टप्प्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर कानपूर, गोवा, बेळगाव,  चेन्नई, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर इथल्य सेंटर्सवरही या चाचण्या केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 375 जणांवर या लशीचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यांच्यावर होणारा परिणाम बघून पुढच्या टप्प्यातली चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्यात 750 लोकांवर चाचणी होईल, अशी माहिती डॉ. गिल्लूरकर यांनी दिली. या मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच लसनिर्मितीचा मार्ग मोकळा होईल. इराणमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक, मृतदेह पुरण्यासाठी खोदण्यात आल्या कबरी निरोगी लोकांना ही लस दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचे सगळे रिपोर्ट्स हे ICMRला पाठविले जाणार आहेत.या लसीला BBV152 COVID vaccine हे नाव देण्यात आलं आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या