मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सोन्याचे दागिने पायात का घातले जात नाहीत? काय आहे याचं कारण

सोन्याचे दागिने पायात का घातले जात नाहीत? काय आहे याचं कारण

सोन्याचे दागिने फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत घालता येतात. गर्भश्रीमंत लोकही पायात सोन्याचे दागिने घालत नाहीत. पायात सोन्याचे दागिने का घातले जात नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 सप्टेंबर : सोने, चांदी, हिरे, मोती अशा विविध प्रकारचे दागिने घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघेही सोन्याचे दागिने घालतात, परंतु विशेषतः स्त्रिया आणि विवाहित महिला सोन्या-चांदीचे-दागिने जास्त घालतात. मात्र, पायात सोन्याचे दागिने घालणे वर्ज्य मानले जाते. सोन्याचे दागिने फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत घालता येतात. गर्भश्रीमंत लोकही पायात सोन्याचे दागिने घालत नाहीत. पायात सोन्याचे दागिने का घातले जात नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे का? दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह यांच्याकडून याविषयी जाणून घेऊया.

पायात सोने न घालण्याची धार्मिक कारणे -

पायात पैजण किंवा इतर चांदीचे जिन्नस घातले जातात. मात्र, कधीही सोन्याच्या धातूचे अलंकार पायात परिधान करू नयेत. याविषयी एक धार्मिक मान्यता आहे की, भगवान श्री हरी विष्णू यांना सोन्याची खूप आवड असल्याने सोने नाभी किंवा कमरेच्या खाली घालू नये. पायात सोनं घातलं तर भगवान विष्णूंचा कोप होतो. भगवान विष्णूंप्रमाणेच माता लक्ष्मीलाही सोने आवडते. असे मानले जाते की, पायात सोने धारण करणाऱ्या व्यक्तीला देवी लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहावे लागते आणि त्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

पायात सोने न घालण्याची शास्त्रीय कारणे -

हिंदू धर्माशी संबंधित अशा अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत, ज्यांना शास्त्रीय कारणही आहे. यापैकी एक म्हणजे पायात सोनं घालू नये. पायात सोने न घालणे देखील वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य मानले जाते. यानुसार माणसाची शारीरिक रचना अशी आहे, ज्यामध्ये शरीराच्या वरच्या भागाला थंडपणा आणि खालच्या भागाला फक्त उबदारपणाची गरज असते. सोन्याच्या दागिन्यांमुळे शरीरातील उष्णता वाढते. अशा स्थितीत पायात सोन्याचे दागिने घातल्यास ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते, त्यामुळे पायात चांदीचे दागिने घालावेत, जेणेकरून शरीराचे तापमान संतुलित राहते.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली काही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Gold and silver, Religion