नागपूर, 06 जुलै : महानगरपालिकेतील गदारोळामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे याना राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. महापालिकामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असलेल्या तक्रारीमध्ये लिहिण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भानुप्रिया ठाकूर यांनी महिला आयोगाकडे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर महापालिका प्रमुख अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांच्याकडून महिला आयोगानं खुलासा मागितला आहे. गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी नगरसेवक आणि तुकाराम मुंढे यांच्याद वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर नोटीस आल्याने तर्कवितर्क लावले जात असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात 8 जुलैपासून सुरु होणार हॉटेल्स आणि लॉज, असे असतील कठोर नियम भानुप्रिया यांनी केलेल्या तक्रारीनुसार, तुकाराम मुंढे प्रसुती हक्क नाकारले. इतकंच नाही तर नोकरीवरुन काढून टाकण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही पाठवली असं त्यांनी म्हटलं आहे. तुकाराम मुंढे यांनी आपल्याला अपमानजनक वागणूक दिली आणि माझा मानसिक छळ केल्याचं भानुप्रिया ठाकूर यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या या खेळीमुळे ठाकरे सरकारमध्ये तणाव, मातोश्रीवर सुरू आहेत खलबतं भानुप्रिया यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाकडून तुकाराम मुंढे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर आता मुंढे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.