जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / राज्यात 8 जुलैपासून सुरु होणार हॉटेल्स आणि लॉज, असे असतील कठोर नियम

राज्यात 8 जुलैपासून सुरु होणार हॉटेल्स आणि लॉज, असे असतील कठोर नियम

राज्यात 8 जुलैपासून सुरु होणार हॉटेल्स आणि लॉज, असे असतील कठोर नियम

ज्या परिसरात जास्त रुग्ण आहेत आणि जो परिसर कन्टेनमेंट झोनमध्ये येतो अशा ठिकाणी हॉटेल्सला सुरू करण्यासाठी परवाणगी देण्यात आली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 जुलै : राज्यात कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. अशात मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे. त्यामुळे कन्टेनमेंट झोन वगळता हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस, लॉज काही प्रमाणात खुले होणार असल्याची घोषणा मुख्य सचिव यांनी केली. पण हॉटेल्स सुरू करण्यासाठी जरी परवाणगी दिली तरी त्यासाठी कठोर नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. राज्यात मुंबई, पुण्यासारख्या अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यानुसार ज्या परिसरात जास्त रुग्ण आहेत आणि जो परिसर कन्टेनमेंट झोनमध्ये येतो अशा ठिकाणी हॉटेल्सला सुरू करण्यासाठी परवाणगी देण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 8 जुलैपासून हॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे व्यवयायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खरंतर, कोरोनाचा धोका वाढत असल्याने अनेक नियमांच्या अंतर्गतच हॉटेल्सला सुरू करण्यासाठी परवाणगी देण्यात आली आहे. संपूर्ण क्षमतेपैकी 33 टक्के वापर गेस्ट हाऊस, लॉज आणि हॉटेल याचा वापर करता येणार आहे. यासाठी पालकमंत्री असलम शेख यांनी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. स्थानिक मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती यावर वेगळा निर्णय घेऊ शकतात अशीही माहिती देण्यात आली आहे. अजित पवारांच्या या खेळीमुळे ठाकरे सरकारमध्ये तणाव, मातोश्रीवर सुरू आहेत खलबतं हॉटेल्स सुरू करण्यासाठी असे आहेत नियम - मुंबईमध्ये हॉटेल आणि लॉज सुरू करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे - फक्त 30 टक्के वरती या सुविधा देता येणार आहेत - हॉटेलमधील स्विमिंग पूलचा वापर करता येणार नाही - इंटरनॅशनल फ्लाईट सुरू झालेल्या आहेत लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा धक्का, या मोठ्या कंपनीने जाहीर केली 50 टक्के वेतन कपात - त्यामुळे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हॉटेल आणि लॉजिंग सुरू करत आहोत-मॉल सुरू करण्याचा अद्याप तरी निर्णय नाही - हॉटेलमधली प्रत्येक खोली किंवा टेबल रिकामा झाल्यानंतर स्वच्छ साफ होणं आवश्यक - प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना सॅनिटायझरचा वापर असावा, मास्क वापरणंही बंधनकारक आहे. - सुरक्षित अंतर असावं अनलॉकसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, या व्यवसायासाठी दिली परवानगी स्वयंशिस्तही महत्वाची -आदित्य ठाकरे ‘हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिलं कारण पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या श्हरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करतांना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे,’ असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. संकलन आणि संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात