मुंबई, 17 मे: नॅशनल अॅग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटने (NABI) पाच पदांसाठी सात जागांवर भरती जाहीर केली आहे. 28 ते 50 वर्षं वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ‘स्टडीकॅफे’ने याबद्दल माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘NABI’ने भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, रिसर्च असोसिएट, सीनिअर रिसर्च फेलो, ज्युनिअर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट आणि प्रोजेक्ट असिस्टंट या पाच पदांवर सात रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यांना थेट इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार ते 47 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन अधिक एचआरए मिळणार आहे. 12वीनंतर इंडियन नेव्हीमध्ये जॉईन व्हायचंय? मग यासाठी पात्रता काय? कोणती परीक्षा असते IMP? A-Z माहिती इच्छुक उमेदवारांनी थेट वॉक इन इंटरव्ह्यूला उपस्थित राहावं. NABIच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना अर्ज उपलब्ध होईल. तो अर्ज भरून उमेदवारांनी इंटरव्ह्यूच्या वेळी सोबत आणावा. तसंच, अनुभवाची सर्टिफिकेट्स, पब्लिकेशन्स आणि ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट्सही सोबत आणावीत, असं अधिसूचनेत म्हटलं आहे. एकापेक्षा अधिक पोस्ट्ससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला प्राधान्यक्रम अर्जात लिहावा. प्रोजेक्ट असोसिएटला 31 हजार रुपये, प्रोजेक्ट असिस्टंटला 20 हजार रुपये, सीनिअर रिसर्च फेलोला 35 हजार रुपये, ज्युनिअर रिसर्च फेलोला 31 हजार रुपये, तर रिसर्च असोसिएटला 47 हजार रुपये एवढं मासिक वेतन मिळेल. ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स; ‘या’ मंत्रालयात भरतीची प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे नॅचरल किंवा अॅग्रिकल्चरल सायन्समधली मास्टर्स डिग्री, एमव्हीएस्सी किंवा इंजिनीअरिंग वा टेक्नॉलॉजी मेडिसीन विषयातली पदवी असणं आवश्यक आहे. किंवा बीएस्सी वा तीन वर्षांचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. सीनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे बेसिक सायन्समधली मास्टर्स डिग्री किंवा प्रोफेशनल कोर्समधली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावी. ISRO Recruitment: फोटोग्राफीपासून ऑटोमोबाईलपर्यंत ISRO मध्ये जॉबची संधी; असा लगेच करा अर्ज ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे बेसिक सायन्समधली मास्टर्स डिग्री किंवा प्रोफेशनल कोर्समधली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावी. रिसर्च असोसिएट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे केमिस्ट्री, फार्मसी, लाइफ सायन्स, फूड सायन्स किंवा टेक्नॉलॉजी, सेल बायोलॉजी, बायकेमिस्ट्री यांपैकी एका विषयातली पीएचडी असणं आवश्यक आहे. केमिकल इंजिनीअरिंग, केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी किंवा अन्य संबंधित शाखेतली पीएचडीही चालू शकेल. तसंच, केमिकल इंजिनीअरिंगमध्ये एमई किंवा एमटेक केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. इंटरव्ह्यू : इच्छुक आणि पात्र उमेदवार 29 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता थेट इंटरव्ह्यूला जाऊ शकतात.
इंटरव्ह्यूचं ठिकाण नॅशनल अॅग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, नॉलेज सिटी, सेक्टर 81, मोहाली, पंजाब - 140306 NABIच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना अर्ज आणि अन्य सविस्तर माहिती उपलब्ध होईल.