जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / ISRO Recruitment: फोटोग्राफीपासून ऑटोमोबाईलपर्यंत ISRO मध्ये जॉबची संधी; असा लगेच करा अर्ज

ISRO Recruitment: फोटोग्राफीपासून ऑटोमोबाईलपर्यंत ISRO मध्ये जॉबची संधी; असा लगेच करा अर्ज

ISRO Recruitment: फोटोग्राफीपासून ऑटोमोबाईलपर्यंत ISRO मध्ये जॉबची संधी; असा लगेच करा अर्ज

या पदासाठी 12 जणांची भरती केली जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला जवळपास 1 लाख 42 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकणार आहे

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 मे: भारतीय अंतराळ संशोधन संघटना अर्थात ‘इस्रो’ने टेक्निकल असिस्टंट या पदासाठी भरतीची घोषणा केली आहे.  या पदासाठी 12 जणांची भरती केली जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला जवळपास 1 लाख 42 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकणार आहे. ‘स्टडीकॅफे’ने याबद्दल माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘इस्रो’ने प्रसिद्ध केलेल्या भरतीच्या अधिसूचनेनुसार, टेक्निकल असिस्टंट या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कमीत कमी 18 वर्षं वयाचे, तर जास्तीत जास्त 35 वर्षं वयाचे असावेत. SC साठी आरक्षित असलेल्या जागांवरच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर OBC साठी आरक्षित असलेल्या जागांवरच्या उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत दिली जाणार आहे. तसंच, अन्य काही वर्गांतल्या उमेदवारांसाठीही नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळणं शक्य आहे. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आहे. लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ‘इस्रो’च्या अधिकृत वेबसाइटवरूनच ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असंही ‘इस्रो’ने स्पष्ट केलं आहे. 12वीनंतर इंडियन नेव्हीमध्ये जॉईन व्हायचंय? मग यासाठी पात्रता काय? कोणती परीक्षा असते IMP? A-Z माहिती फोटोग्राफी विभागात 1, मेकॅनिकल विभागात 8, ऑटोमोबाइल विभागात 1, तर सिव्हिल विभागात 1 अशा एकूण 12 जागांवर भरती होणार आहे. सातव्या पे-स्केल पातळीनुसार, अर्थात 44,900 रुपये ते 1,42,400 रुपयांपर्यंतचं मासिक वेतन उमेदवारांना मिळणार आहे. फोटोग्राफी विभागातल्या नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी फोटोग्राफी/सिनेमॅटोग्राफीतला तीन वर्षांचा डिप्लोमा प्रथम श्रेणीसह पूर्ण केलेला असला पाहिजे. ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स; ‘या’ मंत्रालयात भरतीची प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज मेकॅनिकल विभागातल्या नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा तीन वर्षांचा डिप्लोमा प्रथम श्रेणीसह पूर्ण केलेला असला पाहिजे. ऑटोमोबाइल विभागातल्या नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगचा तीन वर्षांचा डिप्लोमा प्रथम श्रेणीसह पूर्ण केलेला असला पाहिजे.

News18लोकमत
News18लोकमत

सिव्हिल विभागातल्या नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचा तीन वर्षांचा डिप्लोमा प्रथम श्रेणीसह पूर्ण केलेला असला पाहिजे. अर्ज करताना सर्वांना 750 रुपये शुल्क ऑनलाइन भरणं आवश्यक आहे. सवलतीस पात्र असलेल्या उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्यास त्यानंतर त्यांना नियमानुसार काही रक्कम परत केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात