कन्हैय्या खंडेलवाल (प्रतिनिधी), हिंगोली, 11 जुलै: जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे थैमान वाढतच आहे. या संसर्गावर बड्या विकसित देशांनाही नियंत्रण मिळवता आलेले नाही. आपल्या देशातही कोरोना संसर्गाचा आकडा दररोज उच्चांक गाठत आहे. राज्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. परंतु कोरोना संसर्ग नियंत्रित करता येतो याचे उत्तम उदाहरण धारावी आणि हिंगोली. जे जगाला जमलं नाही ते धारावी आणि हिंगोलीनं करून दाखवलं आहे, अशा शब्दांत हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी कौतुक केलं आहे. हेही वाचा… PSI भावांचा दुर्देवी मृत्यू! हृदयविकाराने आधी गेला नितीन तर आता कोरोनामुळे सचिन मुंबईतील धारावीसोबतच हिंगोली हा महाराष्ट्रातील अतिशय मागासलेला आणि ग्रामीण भाग आहे. तरीही जे जगाला जमलं नाही ते हिंगोली सारख्या छोट्या आणि फारशा वैद्यकीय सुविधा नसलेल्या जिल्ह्याने करून दाखवलं आहे. कोरोना रिकव्हरी रेटमध्ये हिंगोली जिल्ह्यात राज्यात प्रथम आहे. हिंगोली जिल्ह्यात रिकव्हरी रेट 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वे 40 दिवसांपेक्षा जास्त आहे. दाट वस्ती असलेल्या धारावी आणि मागासलेल्या हिंगोली जिल्ह्याने ते करून दाखवलं जे जगाला जमलं नाही. विशेष म्हणजे धारावीच्या आमदार आणि हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आहेत. वर्षा गायकवाड यांनी सर्वांचे कौतुक करून धारावी आणि हिंगोली पेटर्न सर्वांनी राबवण्याचे आवाहन केलं आहे.
धारावीचं WHOनं केलं कौतुक… धारावी हा सर्वात मोठा झोपडपट्टी परिसर आहे. या ठिकाणी अतिशय दाटीवाटीत असलेल्या घरांमुळे कोरोनाचा संसर्ग अनियंत्रित पद्धतीने वाढत होता. राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेने धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली. मोठ्या प्रमाणावर यंत्रणा धारावीत कार्यरत झाली. त्याचा परिणाम म्हणून धारावीचा संसर्ग आता नियंत्रणात आला आहे. धारावीचा संसर्ग नियंत्रणात आल्याने या मॉडेलचे कौतुक थेट जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. हेही वाचा.. कोरोनावर वरदान ठरलेले 5 हजाराचे इंजेक्शन तब्बल 21 हजाराला, 2 जणांना अटक मुंबईतील धारावी परिसर ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अशा कठीण परिसरात कोरोना नियंत्रण आणता येऊ शकतो. हे धारावी मॉडेलने दाखवून दिले आहे. या कामाचे कौतुक करताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी म्हटले आहे की, ‘केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो’. जागतिक महामारीच्या परिस्थितही अशी उदाहरणे आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात.

)







