लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसाचाराची धक्कादायक कारणं आली समोर, पोलिसही झाले हैराण

लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसाचाराची धक्कादायक कारणं आली समोर, पोलिसही झाले हैराण

चुप्पी तोड या अभियानाअंतर्गत केवळ महिलाच नाही तर घरगुती हिंसाचाराचा सामना करीत असलेल्या पुरुषांनाही मदत दिली जात आहे

  • Share this:

रायपूर, 4 मे : लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसाचाराच्या (Domestic violence) घटनांमध्ये वाढ झाली आहे. छोट्या – छोट्या कारणांनी महिलांना हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. खुर्शीपार येथील एक छोट्या भावाने आपल्या बहिणीला मारहाण केली. यामागील कारण अत्यंत शुल्लक आहे. त्याने कांदा मागितला होता तो दिला नाही म्हणून त्याने तिला मारहाण केली. याशिवाय एक सरकारी शिक्षकही विनाकारण आपल्या पत्नीला मारहाण करीत असल्याचे समोर आले आहे.

केस स्टडी 1 – खुर्शीपार प्रकरणात छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील खुर्शीपार पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेंद्र उइके यांनी सांगितले की, 30 एप्रिल रोजी ठाण्यात एका महिलेचा फोन आला. तिला तिच्या लहान भावाने मारहाण केली होती. मारहाणीचं कारण ऐकून आम्ही हैराण झालो. घरात स्वयंपाक करीत असताना भावाला अधिक कांदा हवा होता. मात्र घरात कांदे कमी असल्याने तिने देण्यास नकार दिला. यावर रागाच्या भरात त्याने बहिणीला मारहाण केली. यामध्ये 1 मे रोजी भावाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

केस स्टडी 2 – बिलासपूर हायकोर्टा अधिवक्ता आणि समाजसेवक प्रियंका शुक्ला यांनी सांगितले की. 1 मे रोजी त्यांना एका महिलेवर मारहाण झाल्याबाबत कॉल आला होता. या घटनेत एक शिक्षक आपल्या पत्नीला जबर मारहाण करीत होता. यामुळे पत्नीला रक्ताच्या उलट्या होत होत्या. तेथे पोहोचल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार बाळ होत नसल्याने आणि हुंडा न दिल्याने महिलेला मारहाण केली जात होती. लॉकडाऊनमध्ये घरात जास्त वेळ राहत असल्याने हिंसेच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

रायपूर पोलिसांनी सुरू केलं अभियान

लॉकडाऊनच्या काळात रायपुर पोलिसांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता चुप्पी तोड अभियान सुरू केलं आहे. 26 एप्रिलपासून हे अभियान सुरू केलं असून 3 मेपर्यंत 170 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

संबंधित -'मोदी रसोई’नंतर आता चर्चा ‘राहुल गांधी भोजनालया’ची, गावोगावी फिरुन अन्नवाटप

 

First published: May 4, 2020, 5:25 PM IST

ताज्या बातम्या