Home /News /news /

जगावर होऊ शकतो एलियन्सचा हल्ला! NASA नं पृथ्वीचं लोकेशन दिल्यानं खळबळ

जगावर होऊ शकतो एलियन्सचा हल्ला! NASA नं पृथ्वीचं लोकेशन दिल्यानं खळबळ

NASA चा हा संदेश एलियन्सना प्रतिसाद देण्यासाठी आमंत्रित करून कदाचित समाप्त होईल. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या जैवरासायनिक रचना, सौर मंडळाच्या स्थानासह सर्व माहिती त्यामध्ये असल्याने तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे.

    वॉशिंग्टन, 19 एप्रिल : बाह्य अवकाशात पृथ्वीचे स्थान उघड करण्याच्या नासाचा एक प्लॅनमुळे चुकून एलियन्सचा पृथ्वीवर हल्ला होण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी याबाबत इशारा दिला आहे. बायनरी-कोड असलेला 'बीकन इन द गॅलेक्सी' हा संदेश सौरमाला, पृथ्वीचा पृष्ठभाग आणि मानवतेबद्दलची सर्व माहिती आकाशगंगेच्या एका भागावर प्रसारित करण्यात येणार आहे. या भागामध्ये एलियन्सचं घर असल्याचं मानलं जातं. डेलीमेलच्या बातमीनुसार, नासाचा हा संदेश अरेसिबो संदेशाची (Arecibo Message) अद्ययावत आवृत्ती आहे. ज्याने 1974 मध्ये रेडिओ दुर्बिणीच्या मदतीने अंतराळात अशीच माहिती प्रसारित केली होती. ऑक्सफर्डच्या फ्युचर ऑफ ह्युमॅनिटी इन्स्टिट्यूटचे (एफएचआय) वरिष्ठ संशोधक अँडर्स सँडबर्ग यांनी अवकाशात अशी माहिती उघड करणे धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. बाब गंभीर - डेली टेलीग्राफशी बोलताना ते म्हणाले की, हा संदेश एलियन्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता कदाचित खूप कमी असेल, परंतु यामुळे काय होईल हे नेमकं सांगता येत नसलं तरी तुम्हाला ते गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, एलियन्सच्या शोधाबद्दल धक्कादायक बाब म्हणजे अनेक लोक त्यांच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीला गांभीर्याने घेण्यास नकार देतात, ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे कारण ती अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हे वाचा - रशियन सैन्याकडून 155 युक्रेनियन नागरिकांचं अपहरण; जाणून घ्या 10 महत्त्वाचे अपडेट फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, या संदेशात मानवांच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. डॉ. सँडबर्ग यांचे सहकारी टोबी ऑर्ड यांनी 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकातही असाच युक्तिवाद केला आहे. पुस्तकात, त्यांनी अस्तित्व आणि मानवतेच्या भविष्यातील जोखमींचे विश्लेषण केलं आहे. हे वाचा - कोरोनाचा कहर! शांघायमध्ये लॉकडाऊननंतर पहिला मृत्यू, लस न घेणाऱ्यांना मोठा फटका NASA चा हा संदेश एलियन्सना प्रतिसाद देण्यासाठी आमंत्रित करून कदाचित समाप्त होईल. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या जैवरासायनिक रचना, सौर मंडळाच्या स्थानासह सर्व माहिती त्यामध्ये असल्याने तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Aliens, Earth, Nasa

    पुढील बातम्या