पंतप्रधानांच्या संग्रहात 10 हजार पुस्तकं; या मराठी लेखकाचे नरेंद्र मोदी चाहते

पंतप्रधानांच्या संग्रहात 10 हजार पुस्तकं; या मराठी लेखकाचे नरेंद्र मोदी चाहते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचनाची असलेली आवड खूप जणांना माहित नाही. त्यांच्या संग्रहात 10 हजार पुस्तकं आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, ब्रिजेश कुमार सिंग, 30 मे : लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपनं मिळवलेलं यश हे अभूतपूर्व असंच म्हणावं लागेल. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांची तुलना पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कामगिरीशी केली जात आहे. अनेक राजकीय पंडित हे या विजयावर चर्चा करताना दिसत आहेत. आत्तापर्यंत सर्वांना पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या लायब्ररीबद्दल ठाऊक आहे. त्यांच्या वाचनाची आवड माहित आहे. पण, नरेंद्र मोदी यांचं पुस्तक प्रेम हे केव्हाही उजेडात आलेलं नाही. नरेंद्र मोदी यांना देखील वाचनाची आवड आहे. त्यांची स्वत:ची लायब्रेरी देखील असल्याची बाब अनेकांना माहित देखील नाही. पुस्तकांच्या बाबतीत विचार करता नरेंद्र मोदी हे पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या देखील पुढे आहेत.

भाषणात दिसून येते वाचन

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून त्यांना असलेल्या वाचनाची आवड आणि त्यांचं वाचन याची प्रचिती येते. नरेंद्र मोदींचं भाषण हे अधिकारी लिहून देत असतील अशी चर्चा सर्वत्र असली तरी, नरेंद्र मोदी स्वत: त्याची तयारी करतात. भाषणाची ही प्रक्रिया लांब असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीनं यामध्ये लक्ष घालतात.

नरेंद्र मोदींचं पहिलं पुस्तक

लहान असताना नरेंद्र मोदी यांनी घर सोडलं. त्यानंतर देखील त्यांची पुस्तक वाचनाची आवड कमी झाली नाही. 1969मध्ये नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. आणीबाणीनंतर नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं 'संघर्षमां गुजरात' हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लगेचच संपलं होतं. पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळी नरेंद्र मोदी हे 28 वर्षांचे होते. RSSचे वरिष्ठ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांच्या सल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. गुजरातीमध्ये लिहिलेली पुस्तक नंतर हिंदीमध्ये अनुवादीत करत प्रकाशित करण्यात आलं. नरेंद्र मोदींच्या संग्रहामध्ये मराठी पुस्तकांचा देखील समावेश आहे. 'युगंधर' हे पुस्तक नरेंद्र मोदी यांच्या संग्रहामध्ये आहे.

पुढील एक महिना काँग्रेस प्रवक्ते मीडियातून होणार गायब, पक्षाने जाहीर केली भूमिका

पुस्तकांवरील प्रेम कमी झालं नाही

नरेंद्र मोदींवरील जबाबदारी दिवसेंदिवस वाढत होती. त्यानंतर देखील त्यांचं पुस्तकावरील प्रेम कमी झालं नाही. मार्गदर्शक लक्ष्मणदार इनामदार यांच्या सल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी 'सेतुबंध' नावाचं पुस्तक लिहिलं. ऑक्टोबर 2001मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर देखील त्यांचं लिखाण, वाचन सुरूच होतं. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची नऊ पुस्तकं प्रकाशित झाली.

'...तोच मोदींच्या विजयाचा राजमार्ग ठरला', उद्धव ठाकरेंनी सांगितलं विराट विजयाचं कारण

पंतप्रधान असताना देखील लिहिली 2 पुस्तकं

2014मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर देखील नरेंद्र मोदी यांनी दोन पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या ही 13 झाली आहे. शिवाय, अनुवादीत केलेल्या पुस्तकांचा विचार करता हीच संख्या 27 वर पोहोचते. इंग्रजी व्यतिरिक्त तामिळ आणि बांग्लामध्ये देखील त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

10 हजार पुस्तकं लायब्ररिमध्ये

नरेंद्र मोदी यांच्या लायब्ररिमध्ये 10 हजार पुस्तकं आहेत. यामध्ये भारतीय दर्शन, अध्यात्म, महापुरूषांवरील पुस्तकं यांचा समावेश आहे. आपल्या व्यस्त कामामधून वेळ काढत उशिरा रात्रीपर्यंत नरेंद्र मोदी पुस्तक वाचत बसतात.

VIDEO: उद्धव ठाकरेंकडून मंत्रिपदासाठी 'या' एकमेव व्यक्तीच्या नावाची शिफारस

First published: May 30, 2019, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading