'...तोच मोदींच्या विजयाचा राजमार्ग ठरला', उद्धव ठाकरेंनी सांगितलं विराट विजयाचं कारण

नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेकडून अनेकदा टीका करण्यात आली होती. पण त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 08:37 AM IST

'...तोच मोदींच्या विजयाचा राजमार्ग ठरला', उद्धव ठाकरेंनी सांगितलं विराट विजयाचं कारण

मुंबई, 30 मे : "देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत प्रधानसेवक होते, चौकीदार होते. आज पालक बनले आहेत. त्यांचा आधार वाटावा, विश्वास वाटावा असे वातावरण निर्माण झाले व तोच त्यांच्या विजयाचा राजमार्ग ठरला," असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र सामनातून लोकसभा निवडणूक विजयावर भाष्य करण्यात आलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेकडून अनेकदा टीका करण्यात आली होती. पण त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली. या निवडणुकीत दोन्ही पक्षांना चांगलं यशही मिळालं. त्यानंतर आता शिवसेनेनं मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

काय आहे 'सामना'चा आजचा अग्रलेख?

"नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संकटात येईल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. ज्यांनी ही भीती व्यक्त केली व आपली लढाई मोदी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध असल्याची आरोळी ठोकली अशा मंडळींमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या. पण मोदी हे लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत व घटनेच्या चौकटीत राहूनच पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. शपथविधी सोहळय़ासाठी ममता बॅनर्जी यांना दिलेले निमंत्रण त्यांनी नाकारले. हे लोकशाहीच्या चौकटीत बसत नाही. प. बंगालात निवडणूक काळात हिंसाचार झाला हे सत्य आहे. हिंसाचारात जे मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळय़ास बोलावले हे काही रुसण्याचे कारण होऊ शकत नाही. ही सर्व कुटुंबे बांगलादेशी नसून हिंदुस्थानी नागरिक आहेत व इतर सगळय़ांप्रमाणेच पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळय़ास हजर राहण्याचा अधिकार त्यांना आहे. ममता व त्यांच्या पक्षाला हे मान्य नसेल तर त्या लोकशाही मानत नाहीत हे नक्की.

ओडिशात निवडणूक सुरू असतानाच मोठे तुफान आले. त्यात राज्याचे नुकसान झाले. पंतप्रधान मोदी यांनी ओडिशाला मोठी मदत केली आहे. ओडिशात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. आंध्रचे विजयी वीर जगनमोहनही पंतप्रधानांना भेटले व त्यांनी आंध्रसाठी मागण्या केल्या. मोदी यांनी त्या मान्य केल्या. आंध्रातदेखील भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा आहे. निवडणुकीत जे झाले ते विसरून जायला हवे अशी भूमिका मोदी यांनी घेतली आहे. प्रचंड विजय मिळाल्यावर मोदी यांनी विरोधकांविषयी एक शब्दही उच्चारला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. नवे राज्य संयमाने व मानवतेच्या भावनेने काम करील असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच मोदी यांच्या आजच्या शपथ सोहळ्याविषयी जगभरात कुतूहल आहे."

Loading...


VIDEO : मोदींच्या मंत्रिमंडळात 'या' मराठी नेत्यांची लागणार वर्णी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 08:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...