मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास अतिशय धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास अतिशय धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

गेल्या 12 तासात मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दीडशे मि.मी. पेक्षा जास्त पावसासह पश्चिम उपनगरात पावसाचा जास्त परिणाम पाहायला मिळाला.

गेल्या 12 तासात मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दीडशे मि.मी. पेक्षा जास्त पावसासह पश्चिम उपनगरात पावसाचा जास्त परिणाम पाहायला मिळाला.

गेल्या 12 तासात मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दीडशे मि.मी. पेक्षा जास्त पावसासह पश्चिम उपनगरात पावसाचा जास्त परिणाम पाहायला मिळाला.

मुंबई, 05 ऑगस्ट : मुंबई आणि महानगरात पावसाचा कहर अजून सुरुच आहे. अशात मुंबई हवामान विभागानं येत्या 24 तासांत कोकण पट्यात अतीमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणि कोरोनाच्या संकटात बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना आजही अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे. तर पुणे वेधशाळेने येत्या 72 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. तसंच घाटमाथा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.

गेल्या 12 तासात मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दीडशे मि.मी. पेक्षा जास्त पावसासह पश्चिम उपनगरात पावसाचा जास्त परिणाम पाहायला मिळाला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरात सुमारे 300 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मुंबईत आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या 81% पावसाची नोंद झाली आहे. पण सततच्या पावसामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.

भूमिपूजनाआधीच 'रामलल्ला' झाले अब्जाधिश! दानपेटीत जमा आहे इतकी रक्कम

दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा परतला आहे. सध्या मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा फारसा जोर नाही, त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गेल्या 24 तासांपासून मुंबईत धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांताक्रुझ भागात नाल्याला लागून असलेली 2 घरं कोसळली आहे. या दुर्घटनेत 1 महिला आणि 3 मुली नाल्यात पडल्या आहे. एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे. तर दोन तासांच्या प्रयत्नानंतर जान्हवी काकडे नावाच्या दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे तर नदी नाल्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांताक्रुझमधील वाकोल्या परिसरात आज दुपारी नाल्याला लागून असलेली दोन घरं अचानक नाल्यात कोसळली. जोरदार झालेल्या पावसामुळे या घराच्या खालचा भाग हा ढासाळला होता आणि त्यानंतर हे घर पडले.

First published:

Tags: Mumbai rain