अयोध्या, 5 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) होणार आहे. मात्र याआधीच रामलल्ला (Ramlala) अब्जाधीश झाले आहेत. देश आणि जगभरातून लाखो राम भक्त सतत ट्रस्टच्या बँक खात्यात देणगी रक्कम जमा करत आहेत. अयोध्येच्या भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, रामलल्लाच्या खात्यात भाविकांकडून सतत येणाऱ्या देणग्यांमुळे ते आता अब्जाधीश झाले आहेत. एवढेच नव्हे तर हजारो लोक बँकेतून देणगी देण्याच्या प्रक्रियेबद्दलही विचारपूस करीत आहेत. देणगीदारांची संख्या लाखोंमध्ये आहे.
भूमीपूजनाच्या घोषणेपूर्वी 20 कोटी रुपये जमा झाले
फेब्रुवारी महिन्यात श्री रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर एसबीआय बॅंकेत मंदिर बांधण्यासाठी खाते उघडले गेले. मात्र, त्यानंतर लगेचच कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. असे असूनही भाविकांनी दान म्हणून साडेचार कोटी रुपये जमा केले. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली तेव्हा ती देणगी आणखी वाढली. ही तारीख जाहीर होण्यापूर्वी रामललाच्या खात्यात 20 कोटी रुपये जमा होते.
पाण्याच्या बॉटल पेक्षाही कमी दरात मिळणार COVAXIN लस!
लाखोंमध्ये देणगीदारांची संख्या
याबाबत माहिती देताना ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देव गिरी म्हणाले की, बर्याच लोकांनी कोट्यावधी दान केले आहे. यात रामकथा वाचक संत मुरारी बापूंच्या आवाहनावरून त्यांच्या अनुयायांनी चार दिवसांत 18 कोटींची रक्कम जमा केली. यामध्ये भारतात राहणाऱ्या भाविकांनी 11 कोटींची देणगी दिली असून ती मंगळवारी रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा करण्यात आली.
जलमय मुंबईचे भीषण PHOTOS, रस्ते आणि गाड्या गेल्या पाण्याखाली
देणगी देणार्यांपैकी 60 टक्के तरूण लोक आहेत
बँक स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 60 टक्के देणगीदार तरूण आणि तरूण वयोगटातील आहेत, कारण हजारो लोक 1101 रुपये, 501 रुपये, अगदी 101 रुपयांपर्यंत देणगी देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya ram mandir, Ram Mandir