• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आज पहाटे तेथेच त्यांची प्राण ज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि मुलगा विक्रम असा राठोड परिवार आहे.

  • Share this:
अहमदनगर, 05 ऑगस्ट : माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राण ज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि मुलगा विक्रम असा राठोड परिवार आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास प्रवास राम मंदिराचा: जाणून घ्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या 500 वर्षातल्या 14 घटना अनिल राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून गेले 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी युतीच्या काळात मंत्रिमंडळात त्यांचा सामावेश होता. त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे. अनिल राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. अनिल राठोड यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published: