कोरोनाचा रिपोर्ट नेगिटिव्ह आला तरी केली शिक्षकाने आत्महत्या, सासरवाडीत लावून घेतला गळफास

कोरोनाचा रिपोर्ट नेगिटिव्ह आला तरी केली शिक्षकाने आत्महत्या, सासरवाडीत लावून घेतला गळफास

रोज कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा नवीन आकडा समोर येत आहे. गेली 4 महिने लॉकडाऊनमुळे लोकं घरात आहेत. अशात मानसिक संतूलन सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 30 जून : राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. रोज कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा नवीन आकडा समोर येत आहे. गेली 4 महिने लॉकडाऊनमुळे लोकं घरात आहेत. अशात मानसिक संतूलन सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण याचा एक भयानक प्रकार समोर आला आहे. रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही कोरोनाच्या भीतीनं शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची बातमी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेंद्रे रोडवरील ही घटना आहे. चंद्रशेखर तळवार असं आत्महत्या केलेल्या शिक्षकांच नाव आहे. चंद्रशेखर यांची तब्येत खालावल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता अहवाल नेगिटिव्ह आला पण तरीदेखील भीतीमुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये पुन्हा चकमक, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांनी सासुरवडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. एकलकोंडेपणातून त्यांनी ही आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

घटनास्थळावरून चंद्रशेखर यांचा मृतेदह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रशेखर यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर गावात शोककळा पसरली आहे. खरंतर कोरोनामुळे प्रत्येकाच्या आयुष्यावर मोठा बदल झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांनी आपली जीवाभावाची माणसं गमावली. पण यात आपलं मानसिक संतूलन डगमगू न देणं हेच महत्त्वाचं आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 30, 2020, 9:10 AM IST

ताज्या बातम्या