मुंबई, 10 एप्रिल : मुंबईमध्ये कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका आहे. रोज रुग्णांची आणि मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसतं. यातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे 24 तासात दादर शुश्रुषामधील सगळे रुग्ण डिस्चार्ज करावेत असा आदेश देण्यात आला आहे. कारण रुग्णालयातील 2 नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
तर रुग्णालयात नवे रुग्ण घेतले जाणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, शुश्रूषा रुग्णालयातील सगळ्या नर्सच्या swab च्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तर अनेकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. आणि यानंतर शुश्रूशा सील करायचं की नाही यावर विचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवसात 6 रुग्ण आढळले
दादरमध्ये आज 3 नवे रुग्ण आढळले आहे. यामध्ये शुश्रुषा रुग्णालयातील 2 परिचारिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या परिचारिकांचं वय अनुक्रमे 27 आणि 42 आहेत. तर केळकर रोडवर राहणाऱ्या एका 83 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दादरमध्ये एकूण 6 जण कोरोनाबाधित झाले आहे. याआधी पहिला रुग्ण हा शिवाजी पार्क परिसरात आढळून आला आहे.
दरम्यान, धारावीमध्ये आज सकाळी कोरोनाबाधित आणखी 5 नवे रुग्ण आढळले आहे. या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. धारावीत आता एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी दोघेजण हे तबलिगी जमातीच्या संपर्कात आलेले होते. पोलिसांच्या यादीत या दोघांच्या नावाचा समावेश होता. त्यांची तपासणी केली असता पॉझिटिव्ह निघाले आहेत.
ठाणेकरांनो आता बस करा! कोरोनाचा कहर झाल्यावर तुम्ही ऐकणार का?
दरम्यान, हे दोघेही राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं आयसोलेटेड करण्यात आलेलं होतं. धारावीतील ज्या भागात जास्त संशयित आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ड्रोनच्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनिटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनकडून दीडशे डॉक्टर देण्यात येणार आहेत. ज्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाईल, अशी माहिती आहे.
Emergencyचं सांगून महाबळेश्वरला गेलं वाधवान कुटुंब, मुख्यमंत्र्यांनी केली कारवाई
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.