मुंबई, 10 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वेगाने पसरणार्या कोरोनाव्हायरसची साखळी तोडण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेचा काही लोकांवर काही परिणाम झाला नाही. लॉकडाऊनच्या सर्व नियमांना पायी तुडवून डीएचएफएल प्रकरणाशी संबंधित कपिल वाधवान यांच्यासह 22 जण महाबळेश्वर गेले होते. या प्रकरणाला आता एक वेगळे वळण लागले आहे. या लोकांकडे महाराष्ट्र गृह विभागाचे विशेष सचिव आणि अतिरिक्त डीजीपी अमिताभ गुप्ता यांचे पत्र आहे, ज्यात त्यांना कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीचा हवाला देऊन महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कपिल वाधवान यांच्यासह 22 जण महाबळेश्वर गेले असल्याची माहिती समोर येताच विरोधकांनी उद्धव सरकारवर तीव्र हल्ला केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशा व्हीआयपी जाण्यावर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, वाधवान कुटुंबाला पाचगणीच्या रूग्णालयात विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.
रस्त्यावर पडल्या होत्या 2 हजाराच्या नोटा, कोरोनाच्या अफवेचा मिनिटात असा खुलासा
दरम्यान, तपासणीदरम्यान वाधवान बंधूंना सरकारने व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे निदर्शनास आले. सरकारने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की वाधवान कुटुंबात कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती आहे, यामुळे त्यांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यात यावी. तथापि, तपासात अद्याप अशी कोणतीही आपत्कालीन स्थिती सापडली नाही.
पृथ्वीवर आणखी एका संकटाची चाहूल, ओझोनवरील छिद्र 1 दशलक्ष चौरस किलोमीटर वाढलं
यासंदर्भात पोलिसांनी वाधवान बंधूंना महाबळेश्वर येण्याचे कारण विचारले असता त्यांच्या वतीने एक पत्र दाखविण्यात आले. हे पत्र एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्राचे प्रधान सचिव (गृह) अमिताभ गुप्ता यांचे होते.
उद्धव सरकारने ही संपूर्ण बाब गांभीर्याने घेत अमिताभ गुप्ता, विशेष सचिव आणि अतिरिक्त विभागाचे गृह विभाग यांना तातडीने प्रभावी रजेवर पाठविले आहे. अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, 'महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख यांना खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी कशी मिळाली, अशी विचारणा केली जाईल'.
'मुलांना जवळ घेण्यासाठी जीव तुटतो पण...', कोरोना पॉझिटिव्ह नर्स आईची कहाणी
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona