ठाणेकरांनो आता बस करा! कोरोनाचा कहर झाल्यावर तुम्ही ऐकणार का?

ठाणेकरांनो आता बस करा! कोरोनाचा कहर झाल्यावर तुम्ही ऐकणार का?

ठाण्यातील गर्दी कमीच होत नाहीये. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय अशी खंत व्यक्त करत ठाणे महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी कडक कारवाईचा इशारा दिला होता.

  • Share this:

ठाणे, 10 एप्रिल : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढतच चालला आहे. अशात सरकार लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याच्या विचारात आहे तर दुसरीकडे नागरिक मात्र सगळ्या नियमांना पायी तुडवत घराबाहेर पडून गर्दी करतात. ठाण्यातही अशीच परिस्थिती आहे. कोरोनाचा कहर झाल्यावर ठाणेकर ऐकणार का असं म्हणण्याची आता वेळ आली आहे.

ठाण्यातील गर्दी कमीच होत नाहीये. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय अशी खंत व्यक्त करत ठाणे महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी कडक कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, तरीही ठाणेकर काही सुधरत नाहीत. कालच जांभळी नाका होलसेल मार्केट हलवण्यासंदर्भात व्यापारी, पोलिस आणि ठाणे मनपा अधिकारी यांच्यात बैठक झाली होती.

असं नक्की काय घडलं की सलमाननं अचानक शेअर केले कब्रस्तानाचे PHOTOS

त्यानुसार जांभळी नाका मार्केट 4 ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला. पण तरीही मार्केटमधील गर्दी काही केल्या कमी होत नाही. ठाणे मनपाचे अधिकारी भोंग्याच्या साह्याने सोशल डिस्टन्सींगची सुचना करतायेत तरीही ठाणेकर आणि दुकानदार सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवताना दिसले.ॉ

Emergencyचं सांगून महाबळेश्वरला गेलं वाधवान कुटुंब, मुख्यमंत्र्यांनी केली कारवाई

यामुळे ठाणे मनपा अधिका-यांनी दुकानदारांना समज पर नोटीस दिली आहे. पण ठाणेकर इतके बेजबाबदारपणे वागतातच कसे? ठाणेकर गर्दी करतातच कसे ? असे प्रश्न निर्माण झालेत. ठाणेकरांना सर्व यंत्रणा आणि न्युज 18 लोकमत देखील हात जोडून विनंती करत आहे करोनाचा कहर वाढत चाललाय यामुळे जर जांभळी मार्केट जर बंद केले तर आश्चर्य वाटायला नको.

रस्त्यावर पडल्या होत्या 2 हजाराच्या नोटा, कोरोनाच्या अफवेचा मिनिटात असा खुलासा

संकलन, संपादन - रेणुका धायबर

First published: April 10, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading