नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी मैदानात एक अतिशय शांत आणि गंभीर खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र मैदानाबाहेर धोनीचे एक वगेळचे रुप तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या क्रिकेपासून दूर असलेल्या धोनी निवृत्ती घेणार की क्रिकेट खेळणार याबाबत साशंकता असताना आता धोनी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. गेले तीन महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीनं चेन्नईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पहिल्यांदाच साक्षी आणि लग्नाबाबत आपले मत व्यक्त केले. दरम्यान यावेळी लग्नाशी संबंधित प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने प्रत्येकाचे मन आपल्या उत्तरावर जिंकले. ‘लग्नाचा खरा अर्थ वयाच्या 55व्या वर्षी कळतो’ खरं तर, महेंद्रसिंग धोनी म्हटले की एक आदर्श नवरा अशी एक छबी सर्वांसमोर येते. कारण धोनी-साक्षी हे एक आदर्श कपल मानले जातात. मात्र एका कार्यक्रमादरम्यान लग्नाबद्दल बोलताना धोनीने प्रथम प्रत्येकाला आपल्या उत्तरामुळे हसण्यास भाग पाडले आणि नंतर आपल्या आयुष्यातील साक्षीचे महत्त्व सांगून हृदय जिंकले. यावेळी धोनीनं, ‘लग्नाआधी सर्व पुरुष सिंहासारखे असतात, पण लग्नाचा खरा अर्थ फक्त 55 वर्षांचे झाल्यावरच कळते. मी माझ्या बायकोला ज्या गोष्टी करायच्या आहेत ते करु देतो. कारण जर माझी पत्नी सुखी असेल तर मी सुद्धा आनंदी होईल’, असे म्हणत सर्वांचे मन जिंकले. वाचा- चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 2021पर्यंत फक्त धोनी…धोनी!
धोनी-साक्षीने 2010मध्ये केले लग्न भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंग धोनी 9 वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकला. 4 जुलै 2010 रोजी धोनी आणि साक्षी यांनी लग्न केले. विशेष म्हणजे धोनीचा वाढदिवसही जुलै महिन्यातच येतो. साक्षी धोनीच्या सर्व चढ उतारांमध्येसोबत होती. त्यामुळं धोनीच्या क्रिकेट करिअरमध्ये साक्षीचेही तेवढेच महत्त्व आहे. वाचा- चाहत्यांसाठी मोठी बातमी! धोनी बांगलादेशात करणार कमबॅक? 2021पर्यंत धोनी खेळणार आयपीएल तब्बल तीन वेळा चेन्नई सुपरकिंग्ज संघाला चॅम्पियन करणारा धोनी 2021पर्यंत आयपीएल खेळत राहणार आहे. त्यामुळं धोनीकडे 2021पर्यंत सीएसकेचे कर्णधारपद असले. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार चेन्नई संघाच्या मालकांनी धोनी 2021 पर्यंत खेळत राहणार असल्याचे सांगितले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएल 2021मध्ये मोठा लिलाव होणार आहे. त्यामुळं धोनी 2021पर्यंत आयपीएलमधून निवृत्ती घेणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळं धोनी आणखी 2 वर्ष टी-20 क्रिकेट खेळणार आहे”, असे सांगितले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून धोनीला 15 कोटी रुपये मिळतात. वाचा- मुंबईकरांच्या आनंदावर विरजण! टी-20 सामन्याच्या ठिकाणात बदल मार्चमध्ये बांगलादेशात खेळणार क्रिकेट दरम्यान, धोनी आता मार्चमध्ये क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. मात्र धोनी टीम इंडियाकडून नाही तर बांगलादेशमधून क्रिकेट खेळणार आहे. इंडिया टूडेनं दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयकडे सात खेळाडूंची मागणी केली आहे. हे खेळाडू आशियाई इलेव्हन संघाकडून रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाविरोधात 2 टी-20 सामने खेळतील. हे दोन्ही सामने पुढच्या वर्षी 18 आणि 21 मार्चला होणार आहे. या बातमीनुसार टीम इंडियापासून तीन महिने लांब असलेल्या धोनीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं बीसीसीआयनं परवानगी दिल्यास धोनी बांगलादेशमधून क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. बांगलादेशच्या वतीनं बीसीसीआयकडे महेंद्रसिंग धोनीबरोबरच, कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांची मागणी केली आहे.

)







