जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / ''ज्या पद्धतीने पोपटाने..'', नाव न घेता नवनीत राणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

''ज्या पद्धतीने पोपटाने..'', नाव न घेता नवनीत राणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 मे: खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी (Ravi Rana) राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती.त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर नवनीत राणा यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयातून बाहेर येताच त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींकडे त्यांची तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. Twitter वर लवकरच होणार मोठे बदल; नवे मालक Elon Musk यांनी केली घोषणा   महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर होत असल्याची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे दिल्लीत करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं. ज्या पद्धतीने पोपटाने नागपूरच्या पत्रकार परिषदेत 20 फूट खोल खड्ड्यामध्ये गाडू असेल म्हटले होतं. येणाऱ्या काळात मुंबई आणि महाराष्ट्राची जनता त्यांना खड्ड्यात टाकणार आहे यात काही दुमत नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी दिल्लीला जाणार आहे आणि त्यांच्याविरोधात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल ठाकरे सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. महापालिका निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना उत्तर देईल. राम, हनुमानाचा विरोध केल्याची शिक्षा निवडणुकीत त्यांना मिळेल. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज (discharged) मिळाला.. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. रुग्णालयातून बाहेर पडताना नवनीत यांच्या हातात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) दिसली. समर्थकांनी भगवी शाल, हनुमान चालिसेची प्रत आणि हनुमानाची प्रतिमादेखील नवनीत राणा यांना भेट देण्यात आली आणि औक्षणही करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray government) कडाडून टीका केली आहे. ‘यायलाच पाहिजे..!’, मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेचा जबरदस्त टीझर;  क्षणात Viral समर्थकांकडून नवनीत राणांना हनुमानाची मूर्ती देखील देण्यात आली. रुग्णालयाच्या बाहेर येताच ‘हनुमान चालिसा म्हणणं हा गुन्हा आहे का?’ असा सवाल करत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मी अशी कोणती चूक केली? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगायला तयार आहे. 14 दिवसंच काय, 14 वर्ष जरी जेलमध्ये टाकलं तरी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात