Home /News /technology /

Twitter वर लवकरच होणार मोठे बदल; नवे मालक Elon Musk यांनी केली घोषणा

Twitter वर लवकरच होणार मोठे बदल; नवे मालक Elon Musk यांनी केली घोषणा

ट्विटरचे नवीन मालक (new Owner Of Twitter) इलॉन मस्क (Elon Musk on Twitter changes) यांनी एक नवीन खुलासा केला आहे. Twitter वर काय बदलणार याची घोषणा केली आहे.

  नवी दिल्ली, 8 मे: तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होत असतात. दिवसेंदिवस तंत्रज्ञान अधिक प्रगत आणि वेगवान होत चाललं आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये जी अ‍ॅप्लिकेशन्स आपण वापरतो. तीदेखील त्यांच्या फीचर्समध्ये सदैव नवे बदल करत असतात. जेणेकरून लोकांना या अ‍ॅप्लिकेशन्सचा जास्तीतजास्त फायदा घेता येईल आणि ते वापराने त्यांना अधिक सोपं आणि नाविन्यपूर्ण वाटेल. याच संदर्भात टेस्लाचे सीईओ (Tesla CEO) आणि ट्विटरचे नवीन मालक (new Owner Of Twitter) इलॉन मस्क (Elon Musk on Twitter changes) यांनी एक नवीन खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, मायक्रो-ब्लॉगिंग साइटचे संपादन पूर्ण झाल्यानंतर ट्विटर हार्डकोर सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, डिझाईन आणि त्याचबरोबर आणखी काही बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे. याबद्दलचं सविस्तर वृत्त झी न्यूज हिंदीने प्रकाशित केलं आहे. याबद्दल अधिक माहिती देताना टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क म्हणाले, 'माझा ठाम विश्वास आहे की तांत्रिक क्षेत्रातील सर्व मॅनेजर्स तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असले पाहिजेत. सॉफ्टवेअरमधील मॅनेजर्सनी उत्तम सॉफ्टवेअर तयार केली पाहिजेत. नाहीतर ज्याला घोड्यावर स्वारच होता येत नाही, अशा एखाद्या घोडदळाच्या प्रमुखासारखी त्यांची अवस्था असेल!' शुक्रवारी (6 मे 2022) एलन मस्क यांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी लिहिलं, "ट्विटर अधिग्रहण पूर्ण झाल्यास कंपनी हार्डकोर सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, डिझाईन, इन्फोसेक आणि सर्व्हर हार्डवेअर यांच्यावर लक्ष केंद्रीत करेल." त्यांनी त्यांच्या ट्विटसोबत फॉर्च्युनचा एक लेख टॅग केला आहे. ज्यामध्ये असं म्हणत आहेत की, "मस्क यांनी पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरमध्ये (Twitter) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांची संख्या 250 टक्क्यांहून अधिक वाढली आहे."

  वाचा - काश्मिरी तरुणाच्या अनोख्या कौशल्याने मोठमोठ्या फुटबॉलपटूंनाही केले चकित, टॅलेंट पाहून लोक झाले दंग

   दरम्यान जॅक डॉर्सी (Jack Dorsey) हे ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार झाल्याची बातमी ज्यांनी सर्वप्रथम दिली होती ते सीएनबीसीचे डेव्हिड फॅबर (David Faber Of CNBC) यांनी आता एक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एलन मस्क हे काही महिन्यांसाठीच कंपनीचे प्रभारी सीईओ असतील. एका रिपोर्टनुसार, एलन मस्क यांनी ट्विटरच्या $44 अब्ज अधिग्रहण करारासाठी संभाव्य गुंतवणूकदारांना सादरीकरणात योजनांची तपशीलवार माहिती दिली आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल हे डॉर्सी यांच्याकडून जबाबदारी मिळाल्यानंतर नोव्हेंबरपासून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे नेतृत्व करत आहेत.
  ट्विटर ही जगातील मोठी मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. त्यावर अनेक जणं आपली मतं व्यक्त करतात. अशा मोठ्या साईटचं रूपडं बदललं तर त्याबद्दल चर्चाही होईल आणि ती वापरायला नक्कीच मजा येईल. सगळे नेटिझन्स पण या बदलांवर लक्ष ठेवून आहेत.
  First published:

  Tags: Elon musk, Twitter

  पुढील बातम्या