मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मातृदिनीच हरपलं मातृछत्र, लॉकडाऊनमुळे एकुलत्या एक मुलीला घेता आलं नाही अंत्यदर्शन!

मातृदिनीच हरपलं मातृछत्र, लॉकडाऊनमुळे एकुलत्या एक मुलीला घेता आलं नाही अंत्यदर्शन!

आईचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सविताबाईंनी ठाण्याला निघण्याची तयारी केली. पण...

आईचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सविताबाईंनी ठाण्याला निघण्याची तयारी केली. पण...

आईचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सविताबाईंनी ठाण्याला निघण्याची तयारी केली. पण...

ठाणे, 11 मे: मातृदिनी आईनं अखेरचा श्वास घेतला आणि एकुलत्या एक मुलीला तिचं अंत्यदर्शन घेता आलं नाही. आपल्या जन्मदात्रीला शेवटचा निरोपही देता आला नाही. अखेर आईची अंत्ययात्रा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पाहून मुलीच्या अश्रुंचा बांध फुटला. लॉकडाऊनमुळे आई आणि मुलीची शेवटची भेटही होऊ शकली नाही. त्यामुळे 'दुर्दैव' काय असतं, याची प्रचिती या घटनेवरून आली आहे.

हेही वाचा..धक्कादायक! मुंबईत सेलिब्रिटींची चिंता वाढली, केअरटेकरच निघाला कोरोना पॉझिटिव्ह

ही घटना ठाण्यातील आहे. दादा पाटील परिसरात राहणारे वृत्तपत्र विक्रेते आणि ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे विभाग प्रमुख संदीप आवारे यांची आई ताराबाई आवारे (वय-80) यांना गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटका आला होता. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, रविवारी सकाळी ताराबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. आईचं निधन झाल्याची माहिती नाशिक येथे राहणारी एकुलती एक मुलगी सविताबाई यांनी देण्यात आली. मातृदिनीच मातृछत्र हरपल्यानं सविताबाईंना मोठा धक्का बसला.

आईचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सविताबाईंनी ठाण्याला निघण्याची तयारी केली. लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांना लागणारी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केली. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प असल्यामुळे सविताबाई यांना ठाण्याला पोहोचला आलं नाही. जन्मदात्रीला शेवटचा निरोप देता आला नाही.

हेही वाचा..चालत निघालेल्या व्यक्तीचा वाटेतच झालं असं की घरीही पोहोचू शकलं नाही पार्थिव!

असा फुटला मुलीच्या अश्रुंचा बांध!

आईच्या अंत्यविधीला जाता येत नसल्याने सविताबाई अस्वस्थ झाल्या होत्या. त्यावर नातेवाईकांनी आईची अंत्ययात्रा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दाखवण्याची निर्णय घेतला. मोबाइलवर आईचं अंत्यदर्शन घेताच सविताबाईंच्या अश्रुंचा बांध फुटला.

First published:
top videos