जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला! राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला! राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला! राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

अॅमेझॉननं राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात घेतली धाव

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 डिसेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि अॅमेझॉन (Amazon)यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला अॅमेझॉननं कायदेशीर नोटीस बजवली आहे. अॅमेझॉननं राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दिंडोशी कोर्टानं (Dindoshi Court) या प्रकरणी राज ठाकरेंसह मनसे कामगार सेनेला नोटीस बजावली आहे. 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहेत. हेही वाचा… बापरे! 5000 लोकसंख्येचं गाव आणि सरपंचपदाचा लिलाव, 42 लाखांची लागली बोली काय म्हटलं आहे नोटिशीत… मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतील अॅमेझॉन कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उपस्थित राहण्यास मज्जव करण्यात आला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढल्या 5 जानेवारीला त्याची इच्छा असल्यास उपस्थित राहू शकतात, असं दिंडोशी कोर्टानं बजावलेल्या नोटिशीत म्हटलं आहे. अॅमेझॉनच्या अॅपवर इतर भाषाप्रमाणे मराठीला सामावून घेण्याचा मनसेचा आग्रह आहे. त्याला अॅमेझॉन सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा वाद सुरू झाला आहे. मनसेच्या वतीने ‘नो मराठी नो अॅमेझॉन’ ही मोहीम राबवली जात आहे. त्यात आता या नोटीसमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अॅमेझॉनल सनदशीर मार्गानं आंदोलन केल्याचं समजत नसेल तर आता मनसे आपल्या स्टाईलनं आंदोलन करेल, अशी प्रतिक्रिया मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चौहान यांनी दिली आहे. हेही वाचा… मराठा आरक्षणाबाबत संभाजी राजेंना शंका, उद्धव ठाकरे सरकारला दिला ‘हा’ इशारा काय आहे वाद? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांना आपापल्या अॅपमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेनं आधीच दिला होता. ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत ॲप सुरू केले. तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप आणावे, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलनं धडा शिकवेल, असा इशारा देण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात