जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज ठाकरेंच्या भेटीचा भाजप खासदाराला आवरला नाही मोह, विमानतळावर जाऊन घेतली भेट

राज ठाकरेंच्या भेटीचा भाजप खासदाराला आवरला नाही मोह, विमानतळावर जाऊन घेतली भेट

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कुटुंबीयांसह साईदर्शनला आले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शिर्डीला येता आले नव्हते

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कुटुंबीयांसह साईदर्शनला आले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शिर्डीला येता आले नव्हते

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कुटुंबीयांसह साईदर्शनला आले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शिर्डीला येता आले नव्हते

  • -MIN READ Nagardeole,Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

शिर्डी, 01 ऑक्टोबर : आपल्या रोखठोक भाषणामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तरुणांचे चांगलेच चाहते आहे. ते जिथे जातात तिथे त्यांच्याभोवती कार्यकर्ते आणि तरुणांचा गराड असतो. आज राज ठाकरे हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी विमानतळावर जाऊन भेट घेतली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कुटुंबीयांसह साईदर्शनला आले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शिर्डीला येता आले नव्हते. त्यामुळे दोन वर्षानंतर राज ठाकरे हे साईदर्शनला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भाजप खासदार सुजय विखे शिर्डी विमानतळावर पोहोचले आहे. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सुजय विखे पाटील विमानतळावर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या. ( थापा आला आता एक ‘खास माणूस’ येणार, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने ठाकरेंना धक्का ) ‘मी राज ठाकरे यांचा व्यक्तिगत मोठा फॅन आहे. आजपर्यंत त्यांना भेटलो नाही. त्यामुळे आज भेट घेण्यासाठी आलोय. मनसेच्या स्थानिक नगरसेवकाच्या आग्रहामुळे स्वागताला आलो आहे. मनसे भाजप युती बाबत माझ्या मनातलं माझ्या मनातच ठेवणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली. (काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्रातून? चर्चेदरम्यान नाना पटोलेंचा मोठा खुलासा, थेट नावच सांगितलं) दरम्यान, शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेचं वजन वाढलं आहे. भाजप नेत्यांची राज ठाकरे यांच्या निवास्थानी ये जा वाढली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या भेटींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेत्यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली आहे. पण, अद्याप भाजप आणि मनसेच्या युतीचा कोणताही निर्णय झालेला नाही. नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती, त्यामुळे राज ठाकरे आता नाशिकमध्ये नव्याने कशी उभारणी करणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात