चार वर्षाच्या मुलीने खाण्यासाठी दिला नकार, आईने जीव जाईपर्यंत दिला मार!

चार वर्षाच्या मुलीने खाण्यासाठी दिला नकार, आईने जीव जाईपर्यंत दिला मार!

आई जेवढी आपल्या मुलांची काळजी घेत तेवढी कोणीही घेत नाही. आई आणि लेकराच्या नात्याइतकं पवित्र काही नाही असं म्हटलं जातं. पण...!

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 07 ऑक्टोबर : असं म्हणतात की, आई जेवढी आपल्या मुलांची काळजी घेत तेवढी कोणीही घेत नाही. आई आणि लेकराच्या नात्याइतकं पवित्र काही नाही असं म्हटलं जातं. पण या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या लेकराची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चार वर्षांच्या मुलीची तिच्या आईनेच हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

चार वर्षाच्या मुलीने खाण्यासाठी नकार दिल्यामुळे रागात आईने तिची हत्या केली. पण आईचा मुलीवर आधीपासूनच राग होता अशी माहिती आरोपीच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात हे घडलं आहे. गेल्या एक आठवड्यापासून मृत चिमुकलीला ताप होता. त्यामुळे ती काहीही खाण्यास तयार नव्हती. अशात आईला राग आणि तिने मुलीची हत्या केली. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणातील प्रत्येक बाबींचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या - महाराष्ट्र हादरला! भाजप नेत्यासह कुटुंबावर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी मुलीच्या आईविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची आई नर्स म्हणून काम करते. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.

'गेल्या एक आठवड्यापासून चिमुकलीला होता ताप'

मृत मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यापासून मुलीला ताप होता. ज्यामुळे तिला जवळच्या रुग्णालयात नेलं होतं. तिथे तिला उलट्या झाल्या. त्यामुळे मुलीचा आजरपणामुळे मृत्यू झाला असावा की आईने केलेल्या मारहाणीमुळे यावर संभ्रम आहे. तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सत्य समोर येईलं असं पोलिसांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या - SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 09:46 AM IST

ताज्या बातम्या