भुसावळ, 07 ऑक्टोबर : भुसावळमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. जेव्हा नगरसेवक रवींद्र हे त्यांच्या कुटुंबासोबत घरी होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर रविंद्रच्या घरी देशी पिस्तूल, चाकू घेऊन घुसले आणि गोळ्या झाडल्या. हल्ला करुन हल्लेखोर तिथून पळून गेले पण नंतर त्यांनी आत्मसमर्पण केलं. हल्ल्यात वापरलेली शस्त्रे घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गोळीबारात जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेमागील खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. इतर बातम्या - दुष्काळी भागात मुसळधार, कित्येक वर्षानंतर नदीला पूर मात्र दोघांचा जीव गेला गोळीबारात मयत झालेल्याची नावे 1)सागर रवींद्र खरात, 2) हंसराज रवींद्र खरात, 3) रवींद्र बाबुराव खरात 4)मोहित गजरे 5) सुनिल बाबुराव खरात गोळीबारानंतर 1) शेखर मेघे 2) मोहसीन अजगर खान 3) मयुरेश सुरडकर हे स्व:त पोलीस ठाण्यात हजर झाले असून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
SPECIAL : ‘रावडी नितीन’ : ‘डॅशिंग’ नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

)







