मुंबई, 21 जून : महाविकास आघाडी सरकारवर सर्वात मोठं संकट ओढावलं आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलंय. शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरतमधील हॉटेलमध्ये आहेत. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील राजन विचारे (Rajan Vichare) आणि डॉ, श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे नॉट रिचेबल आहेत. यापैकी श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पूत्र आहेत. ते सध्या दिल्लीमध्ये असल्याची माहिती आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं खासदारांना तातडीनं मुंबईत बोलावलं आहे.त्यावेळी हे खासदार नॉट रिचेबल असल्यानं शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. शिंदे नाराज का? एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खदखद सुरू होती, असं समोर आलं आहे. मराठा समाजाच्या विषयावरून ही खदखद टोकाला गेली होती. यातून एकनाथ शिंदे यांना बाजूला करून मराठा समाजाची थेट मनं जिंकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू होता.त्यासाठी विनायक राऊत यांना पुढे करून मराठा समाजाच्या नेत्यांशी बैठका सुरू होत्या. येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या नेत्यांशी मुख्यमंत्री थेट बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार होते. मराठा समाजाचे शैक्षणिक प्रश्न आणि नोकर भरती बाबत ही बैठक होणार होती. त्यासाठी एकनाथ शिंदेना डावलून विनायक राऊत यांना मुख्यमंत्र्यांनी पुढे केले होते. मुंबईतील एका हॉटेलमध्ये या गाठीभेटी झाल्या होत्या. मराठा क्रांती मोर्चाला याबाबत पत्रही मुख्यमंत्र्यांनी द्यायला लावलं होतं. हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहे. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात, बोलावली तातडीची बैठक गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत सुरतमध्ये आहेत. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.