मुंबई, 11 जुलै : आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये (shivsena) खासदार सुद्धा बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackery)यांच्या बैठकीमध्ये खासदार आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. सर्व खासदारांनी (shivsena mp) आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राऊत हे बैठकीनंतर कुणाशीही न बोलता बाहेर पडाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध इतर सर्व खासदार अशी चर्चा झाली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करण्याची आग्रही भूमिका मांडली. तर शिवसेनेचा इतर सर्व खासदारांचा NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान करावे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली. यावर उद्धव ठाकरे यांनी पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करू, असे आश्वासन सर्व खासदारांना दिले. पण, यावेळी मातोश्रीवरच्या बैठकीत संजय राऊत विरुद्ध इतर सर्व खासदार अशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एवढंच नाहीतर संजय राऊत मातोश्री बाहेर पडल्यावर काही ही न बोलता निघून गेले. ( मुंबईची तुंबई सोडा; पावसाने कराचीचे काय बेक्कार हाल केलेत पाहा VIDEO! ) दरम्यान, या बैठकीला शिवसेनेचे 12 खासदार हजर झाले आहे. शिवसेनेचे खासदार उशिराने गैरहजर झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण आता शिवसेनेच्या एकूण 19 लोकसभा खासदारांपैकी 12 खासदार बैठकीला उपस्थित तर 7 खासदार अनुपस्थित आहे.या बैठकीला एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. तर ईडीच्या कारवाईने त्रस्त असलेल्या खासदार भावना गवळी सुद्धा या बैठकीला गैरहजर होत्या. ( आत्महत्येचा विचार करणाऱ्या निक किर्गियोसनं कसं स्वत:ला सावरलं? ) दरम्यान, या बैठकीत शिवसेना पक्ष येत्या 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार आणि आमदार NDA चे उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भातच ‘मातोश्री’वरील बैठक पार पडली. विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.