• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मराठा आरक्षणावर सत्ताधारी विरोधक पेटले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी केले गंभीर आरोप

मराठा आरक्षणावर सत्ताधारी विरोधक पेटले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी केले गंभीर आरोप

मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही हे पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे. अशात आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटल्याचं पाहायला मिळतं आहे.

  • Share this:
मुंबई, 26 ऑगस्ट : आज मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या याचिकांची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करण्यात यावी यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आभासी कोर्टामध्ये सुनावणी सुरू असून याचिकाकर्त्यांनी आरक्षणाची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही हे पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे. अशात आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटल्याचं पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र सरकार अजूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर नाही आहे. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी असताना महाराष्ट्र सरकारच्या वकीला मध्येच समन्वय पाहायला मिळत नाही असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता सरकार गंभीर नसल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी फेटाळला आहे. 'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', उद्धव ठाकरेंना मिळालेल्या पत्राने खळबळ मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते सरकार करतं आहे असं प्रत्युत्तर थोरात यांनी दिलं आहे. आम्ही सगळ्या मराठा संघटनांशी, वकीलांशी चर्चा करत आहोत. मराठा आरक्षणाबाबत काही जणांनी राजकारण सुरु केलं आहे. हा विषय राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे. पण जण राजकीय मतलब साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप थोरात यांनी केला आहे. मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, 11287 पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणं नाहीत! दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्काळ बैठक बोलवावी अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केली. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या प्रकरणी 26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या मागणीला महत्त्व आले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार बेफिकीर असल्यासारखा वागत असून सरकार हे आरक्षणाबाबत गंभीर नाही अशी टीका त्यांनी केली. शरद पवारांनी मनावर घेतलं असतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
Published by:Renuka Dhaybar
First published: