धक्कादायक : पुण्यातील सिंहगड परिसरात महिलेचा खून

धक्कादायक : पुण्यातील सिंहगड परिसरात महिलेचा खून

सिंहगड रोड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

  • Share this:

पुणे, 4 मे : राज्यासह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाला सामना करण्यासाठी लढत आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण साडत आहेत. मात्र या स्थितीतही गुन्ह्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. अशातच पुण्यातील सिंहगड परिसरात महिलेचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

सिंहगड रोड तुकाईनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून मोना मदने असं महिलेचं नाव आहे. पूर्ववैमनस्यातून या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे. ज्या महिलेचा खून करण्यात आली ती अवैध धंद्याविरोधात वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार देत होती. त्याचाच राग मनात ठेवून तिची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. खून झालेल्या महिलेचा मृतदेह ससून रुग्णालात पाठवण्यात आला असून सिंहगड रोड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पुण्यात लॉकडाऊनची काय आहे स्थिती?

पुण्यात नॉन कंटेनमेंट एरियात सवलती मिळाल्या असल्या तरी प्रतिबंधित भागातील नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी कायम राहील. थोडक्यात इकडून तिकडं आणि तिकडून येजा करता येणार नाही. तसंच ग्रीनमध्येही रात्रीची संचारबंदी यापुढेही कायम असणार आहे. लहान आणि वयोवृद्धांनाही वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

या प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम..

मंगळवार पेठ, जूना बाजार, पर्वती दर्शन परिसर 1, 2, पर्वती चाळ क्र. 52 झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, पर्वती दत्तवाडी, पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज 1, 2, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना भवानी पेठ, कोंढवा बुद्रुक, काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक, नॉटिंग हिल सोसायटी, उंड्री, होलेवस्ती, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड, शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ, कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स मार्ग, पुणे स्टेशन, ताडीवाला रस्ता, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत, घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर, पर्वती, तळजाई वस्ती 1, 2, धनकवडी, बालाजीनगर, पर्वती शिवदर्शन 1, 2, धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी, साईसमृध्दी परिसर, वडगावशेरी, गणेशनगर, रामनगर, टेम्पो चौक, लोहगाव, कालवडवस्ती, बिबवेवाडी, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, डायसप्लॉट, मीनाताई ठाकरेनगर, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी स. नं. 650, गुलटेकडी, सेव्हन डे अ‍ॅडव्हेंटीज मिशन, बिबवेवाडी, ढोलेमळा झोपडपट्टी, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर, गांधीनगर 2, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर, आळंदी रोड, कळस, जाधववस्ती, येरवडा प्रभाग क्र. 6, हडपसर रामनगर, रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी, हडपसर सय्यदनगर 1, 2, 3, गुलामअलीनगर, कोंढवा खुर्द शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, कोंढवा खुर्द मिठानगर, वानवडी एसआरपीएफ, शिवाजीनगर कामगार पुतळा, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, शिवाजीनगर रेल्वे लाइन उत्तरेकडील बाजू, शिवाजीनगर न. ता. वाडी, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉँग्रेसभवन पाठीमागील बाजू, हडपसर चिंतामणीनगर, रेल्वे गेटजवळ, हडपसर आदर्श कॉलनी, वेताळनगर, सातववाडी, हडपसर माळवाडी, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 4, 2020, 4:54 PM IST

ताज्या बातम्या