कोलकाता, 01 ऑगस्ट : पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये रविवारी रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. पिकअप व्हॅनला विद्युत प्रवाह लागून 10 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व लोक कावडधारी होते. या अपघातात अनेक जण भाजले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पिकअपमध्ये 27 लोक होते. पिकअपच्या मागील बाजूस लावलेल्या जनरेटरच्या (डीजे सिस्टीम) वायरिंगमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ही पिकअप व्हॅन जल्पेशसाठी जात (Cooch Behar Accident) होती. जळालेल्या लोकांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पिकअप व्हॅनमध्ये 27 लोक होते. यापैकी 16 जणांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. तर 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिकअप व्हॅनमधील डीजे सिस्टीमच्या जनरेटरच्या वायरिंगमुळे ही घटना घडली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातून विद्युत प्रवाह संपूर्ण वाहनात पसरल्याचे सांगण्यात येत आहे.
10 dead, many injured due to electrocution in WB's Cooch Behar
— ANI Digital (@ani_digital) August 1, 2022
Read @ANI Story | https://t.co/NRuuvk2tO5#WestBengal #CoochBehar #WBaccident pic.twitter.com/M3IglQkoDo
माथाभंगाचे एसपी यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जलपाईगुडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातानंतर चालक पळून गेला. एएसपी म्हणाले की पिकअप जप्त करण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

)







